Grapenet : ‘ग्रेपनेट’मध्ये ३१ हजार द्राक्ष प्लॉटची नोंदणी

महाराष्ट्र, कर्नाटकमधून होणार निर्यात; प्रतिसाद कमी
Grapenet
Grapenet Agrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा
नाशिक ः ‘द्राक्ष हंगाम २०२२-२३’ (Grape season) साठी निर्यात होण्यासाठी ग्रेपनेट प्रणालीत नोंदणी सुरू झाली आहे. मात्र मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ही नोंदणीची स्थिती काही प्रमाणात संथ असल्याची स्थिती आहे. २२ डिसेंबरअखेर महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात ३१,८२१ प्लॉटची नोंदणी पूर्ण झाली आहे. यंदा पावसामुळे हंगाम प्रभावित झाल्याने नोंदणी लांबणीवर गेल्याची स्थिती आहे. यामुळे जानेवारी महिन्यापर्यंत याचा टक्का वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Grapenet
Grape Export : सात हजार शेतकऱ्यांची द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी

गोडी बहार छाटण्या झाल्यानंतर ग्रेपनेट प्रणालीत निर्यातक्षम बागांची नोंदणी सुरू होते. हे कामकाज यंदा संथपणे सुरू आहे. सप्टेंबर महिन्यात द्राक्ष गोडी बहर छाटणी सुरू होते. मात्र संततधार पाऊस व ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीच्या तडाख्यात गोडीबहर छाटणीची कामे अडचणीत आली. त्यामुळे हंगाम प्रभावित होऊन जवळपास चार आठवडे पुढे गेल्याची स्थिती आहे. चालूवर्षी आव्हानात्मक परिस्थितीत द्राक्ष उत्पादक हंगामाला सामोरे गेले आहेत. त्यामुळे छाटणी झाल्यानंतर ग्रेपनेट प्रणालीत नोंदणी लांबणीवर गेल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.

Grapenet
द्राक्ष निर्यातीसाठी आतापर्यंत  १८०० शेतकऱ्यांकडून नोंदणी

नियमीत द्राक्ष हंगामात सप्टेंबरमध्ये छाटलेल्या बागेत काही भागांमध्ये पावसात घड जिरणे, एकसारखेपणा नसणे अशा अडचणी आल्या. २५ ऑक्टोबर अखेर छाटलेल्या बागा काही प्रमाणात व्यवस्थित आहेत. यंदा पावसामुळे द्राक्ष छाटणी प्रभावित झाली आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत उशिरा बागेत माल निघण्यास जिरण्याची समस्या दिसून आली आहे.

..........
चौकट :
उत्तर महाराष्ट्र, विदर्भात नोंदणी
यंदा उत्तर महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यात किरकोळ प्रमाणात नोंदणी केली जात आहे. तर विदर्भात बुलडाणा जिल्ह्यात नोंदणीत हळूहळू वाढ होत आहे. याशिवाय मराठवाडा निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात पुढे येत आहे.

Grapenet
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत एक लाख ३१ हजार क्‍विंटल बियाण्यांची गरज

--------------
प्रतिक्रिया ः
यंदा १४ ऑक्टोबरपर्यंत उघडणारा पाऊस २२ ऑक्टोबर रोजी उघडला. जवळपास ८ दिवस पाऊस अधिक राहिला. त्यामुळे छाटणी लांबणीवर गेली. उशिरा छाटलेल्या बागेत पोंगा अवस्थेतील बागेत एकसारखेपणा नाही. यासह कॅनोपीमध्ये अडचणी आहेत. त्यामुळे कामकाज पुढे गेल्याने यंदा ग्रेपनेट नोंदणी उशिराने होत आहे.
-कैलास भोसले, उपाध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ.

------
चालू वर्षाच्या द्राक्ष निर्यातीसाठी ग्रेपनेट प्रणालीत झालेली नोंदणी कमी असली तरी अंतिम टप्प्यात ती पूर्ण होईल. ३१ जानेवारीपर्यंत नोंदणी करता येईल.
-कैलास शिरसाठ, कृषी उपसंचालक, नाशिक.

राज्यनिहाय द्राक्षबागा प्लॉट नोंदणीची स्थिती:
राज्य...नूतनीकरण...नवी नोंदणी...एकूण
महाराष्ट्र...२६,००९....५,७४५...३१,५५४
कर्नाटक...४६...२१...६७
एकूण...२६,०५५...५,७६६...३१,८२१

---------
राज्यातील प्लॉट नोंदणीची स्थिती:
जिल्हा... नूतनीकरण...नवी नोंदणी
नगर...५१९...२८३...८०२
औरंगाबाद...०...१...१
बीड...२...०...२
बुलडाणा...७५...०...७५
धुळे...०...७...७
जालना...०...१...१
लातूर...११३...१०८...२२१
नाशिक...१७,४६३...२,२२९...१९,६९२
उस्मानाबाद...५५०...५...५५५
पुणे...६९३...१८३...८७६
सांगली...५,११२...२,८३४...७,९४६
सातारा...३६२.. ३९...४०१
सोलापूर...१,११७...५६...१,१७३
वाशीम...३...०...३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com