Rabi season : येत्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर कमीत कमी म्हणजेच २० टक्क्यांनी कमी करावा असं शेतकऱ्यांना केंद्र सरकारने आवाहन केल आहे. जमिनीची सुपीकता आणि मानवी आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार करुन हे पाऊल उचलण्यात आलं आहे. अशी माहिती केंद्रीय रसायने आणि खत मंत्री मनसुख मांडविया यांनी दिल्ली येथे दिली.
रासायनिक खतांचा वापर कमी करुन आपल्याला नॅनो-लिक्विड युरिया, नॅनो-लिक्विड डीएपी, बायो-फर्टिलायझर्स आणि पीआरओएम (फॉस्फेट रिच ऑरगॅनिक खत) सारखे पर्याय उपलब्ध आहेत. या पर्यांयाविषय़ी शेतकऱ्यांना माहिती व्हावी यासाठी केंद्र सरकारच्या वतीनं कृषी रथयात्राही काढण्यात येणार असल्याची माहिती मांडवीया यांनी दिली. याशिवाय शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला चालना देण्यासाठी गेल्या नऊ वर्षांत केंद्र सरकारने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांचे प्रदर्शन करण्यासाठी 'किसान समृद्धी महोत्सव' कार्यक्रमाचे आयोजन करण्याचीही सरकारची योजना आहे. शेतीसाठी दिला जाणारा अनुदानित युरिया इतर उद्योगांकडे वळवण्याविरुद्ध ही कठोर पाऊले उचलण्यात येतील. तसेच दोषी असलेल्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असही सांगितल.
रासायनिक खतांचा अतिवापरामुळे घटतेय जमिनीची सुपीकता
रासायनिक खतांचा वारेमाप वापर वाढल्यामुळे जमिनीची सुपीकता घटत आहे. तसेच मानवी आरोग्यावर देखील त्याचा विपरीत परिणाम होत आहे. देशातील ५०० प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राच्या (PMKSK) एक हजाराहून अधिक शेतकर्यांना संबोधीत करताना मांडवीया यांनी रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या दुष्परिणामाविषयी माहिती दिली.
देशात सध्या १५० लाख मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध आहे. खते पुरेशी उपलब्ध असल्यामुळे चालू खरीपासह रब्बी हंगामाची शेतकऱ्यांची खतांची गरज भागणार असल्याचे मंत्री मांडवीय म्हणाले. नॅनो युरिया, नॅनो डीएपी आणि पर्यायी खते वापरण्याविषयी केल्या जाणाऱ्या जनजागृतीविषयीही मांडवीया यांनी आढावा घेतला. प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रामार्फत शेतकऱ्यांना आवश्यक कृषी निविष्ठा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात यासाठी वन-स्टॉप-शॉप हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना खते, बियाणे, अवजारे आणि सरकारच्या विविध योजनांविषयी माहिती दिली जाईल. याशिवाय रासायनिक खतांचा वापर कसा कमी करता येईल याविषयी चर्चा झाली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.