Fertilizer use: रासायनिक खतांचा वापर करण्यासाठी कृषी शास्त्रज्ञांनी पुढाकार घ्यावा

Chemical Fertilizer : जमिनित रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर टाळण्यासाठी मार्ग शोधण्याची धुरा आता कृषी शास्त्रज्ञांच्या खांद्यावर देण्यात आली. यासाठी शास्त्रज्ञांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन खतमंत्री मनसुख मांडविया आणि निती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी केले.
Fertilizer Use
Fertilizer UseAgrowon
Published on
Updated on

Niti Aayog : नवी दिल्ली: शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर कमी करून मातीचे आरोग्य जपण्यासाठी केंद्राने पीएम-प्रणाम योजना जाहीर केली. जमिनित रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर टाळण्यासाठी मार्ग शोधण्याची धुरा आता कृषी शास्त्रज्ञांच्या खांद्यावर देण्यात आली. यासाठी शास्त्रज्ञांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन खतमंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandviy) आणि निती आयोगाचे सदस्य रमेश चंद (RameshChand) यांनी केले.

मातीचे आरोग्य आणि शाश्वतता टिकून ठेवण्यासाठी रासायनिक खतांवरील अवलंबून कमी करण्यासाठी पर्यायी पोषणमुल्यांचा प्रचार, या विषयावरील परिषदेत ते बोलत होते. या परिषदेत देशातील कृषी विद्यापिठांचे कुलगुरू, राज्य कृषी विभागांचे अधिकारी, खत निर्माते आणि विक्रेते, शेतकरी गट आणि एनजीओचे प्रतिनिधी, कृषी मंत्रालायाचे अधिकारी तसेच रसायने आणि खते मंत्रायलय आणि निती आयोगाचे अधिकारी उपस्थित होते.

Fertilizer Use
Fertilizer, Pesticide Use : रासायनिक खते, कीटकनाशकांचा अमर्याद वापर टाळावा

निती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी सांगितले की, शेतीमध्ये रासायनिक खते वापरणे सोपे आहे. त्यामुळे शेतकरी या खतांच्या अतिरिक्त वापराचा काय दुष्परिणाम होतो याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. त्यामुळे भारतात शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब होणे गरजेचे आहे. शाश्वत शेतीचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी सर्वच पातळ्यांवरील घटकांचा सहभाग आवश्यक आहे. शेती उत्पादकता वाढविताना शेतकऱ्यांचे कल्याण आणि पर्यावरणाचे रक्षण व्हावे. यासोबतच शेती क्षेत्राचा विकसही व्हावा. 

Fertilizer Use
Chemical Fertilizer : रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी प्रयत्नांची गरज

खत मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर झाल्यास जमिन नापीक होते. सोबतच याचा मानवी आरोग्य आणि पशुधन आरोग्यावरही विपरित परिणाम होतात. त्यामुळे शेतीत नॅनो युरिया आणि नॅनो डिएपी सारख्या पर्यायी खतांचा वापर व्हावा. ही दोन्ही रासायनिक खते आहेत. पण त्याचा वापर कार्यक्षमपणे होऊ शकतो.

देशाच्या कृषी विकासात कृषी शास्त्रज्ञांनी मोठी भुमिका पार पाडली आहे. पण आता वेळ आली की कृषी शास्त्रज्ञांनी शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर कमी होण्यासाठी पुढाकार घेऊन सर्वांना जागृत करावे. शास्त्रज्ञांना मार्ग काढावा. त्याचा अवलंब शेतकरी करतील, असे आवाहनही खत मंत्र्यांनी केले. 

प्रतिक्रिया
शेती उत्पादन वाढविण्याची आपली जबाबदारी आहे. पण हे करताना मातीच्या आरोग्याशी तडजोड न करता शेतीला बळकटी द्यावी लागेल. तसेच आपल्या नागरिकांच्या आरोग्याचे हीतही आपल्याला जोपासावे लागेल. शेतीवर रासायनिक खतांचा होणारा विपरित परिणाम कमी करण्यासाठी सर्वांना सरकारसोबत काम करावे लागेल.
- मनसुख मांडविया, केंद्रीय खत मंत्री

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com