Agriculture Recruitment : कृषी महाविद्यालयात मंजूर पदभरती करावी

या वेळी उत्तर देताना अब्दुल सत्तार म्हणाले, की वित्त विभाग, शासन निर्णयानुसार ४ मे २०२२, ४ जून २०२१ व ३० सप्टेंबर २०२२ अन्वये पदभरतीवर निर्बंध घालण्यात आले होते.
Eknath Khadse
Eknath KhadseAgrowon

मुक्ताईनगर, जि.जळगाव : येथील शासकीय कृषी महाविद्यालय (Government Agriculture College) २०१५ पासून नियमित सुरू आहे. परंतु महाविद्यालयासाठी पद भरती मंजूर असूनही अद्यापपर्यंत पदभरती करण्यात आली नाही, ही बाब लक्षात घेऊन आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेमध्ये औचित्याच्या मुद्द्याद्वारे हा प्रश्न मांडून सरकारचे लक्ष वेधले. त्याला कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी उत्तर दिले.

Eknath Khadse
Eknath Khadse : दूध संघ गैरव्यवहाराच्या गुन्ह्यासाठी ‘हाय होल्टेज ड्रामा’

या वेळी उत्तर देताना अब्दुल सत्तार म्हणाले, की वित्त विभाग, शासन निर्णयानुसार ४ मे २०२२, ४ जून २०२१ व ३० सप्टेंबर २०२२ अन्वये पदभरतीवर निर्बंध घालण्यात आले होते. वित्त विभाग शासन निर्णय ३१ ऑक्टोबर २०२२ अन्वये पदभरतीवरील निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे.

ज्या विभागांचा किंवा कार्यालयाचा सुधारित आकृतिबंध अद्याप अंतिम झालेला नाही, अशा विभाग, कार्यालयातील गट अ, गट क मधील (वाहनचालक व गट -ड संवर्गातील पदे वगळून) सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदाच्या ८० टक्के मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार रिक्त पदे भरण्याबाबतची कार्यवाही विद्यापीठ स्तरावर करण्यात येईल, असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com