Onion Rate : लासलगावमध्ये विक्रमी कांद्याची आवक, कोट्यावधींची उलाढाल

Lasalgaon Market Committee : लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात मागच्या दोन दिवसांपासून २०३५ वाहनांमधून सर्वाधिक ३७५५० क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली.
Onion Rate
Onion RateAgrowon

Onion Price : नाशिक जिल्ह्यातील लासलगाव ही कांद्यांची मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. मागच्या काही दिवसांपासून कांदा आवकेवरून संभ्रम निर्माण झाला होता. तर कांद्याचे उत्पादन कमी झाल्याने कांद्याचे दर वाढणार असल्याची शंका व्यक्त केली जात होती.

दरम्यान नाशिकच्या लासलगाव येथील मुख्य बाजार समिती परिसरात मागच्या दोन दिवसांपासून २०३५ वाहनांमधून सर्वाधिक ३७५५० क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. याबाबत बाजारसमितीकडून माहिती देण्यात आली.

या कांद्याला बाजारभाव कमीत कमी ७०० रूपये तर जास्तीत जास्त २६५१ रूपये दर दिला जात आहे. याचबरोबर मध्यम कांद्याला १४६० रूपये प्रतिक्विंटल भाव मिळत होता.

कालपासून बाजारसमितीत कांदा उत्पादक शेतकरी उन्हाळ कांदा घेऊन येत होते. यामध्ये ४६० ट्रॅक्टर तर १५७५ पिकअप मधून जवळपास ३७ हजार ५५० क्विंटल कांदा विक्रीस आला होता. या वाहनांमुळे बाजारसमितीत मोठी गर्दी झाली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाल्याने भविष्यात कांदा टंचाई भासणार नसल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान बाजारसमितीत मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची गर्दी झाल्याने कांद्याची लिलाव प्रक्रीया लवकर पूर्ण करण्याचे मागणी करण्यात आली. याबाबत बाजारसमितीतील अडते, व्यापारी, मदतनीस, कामगार व बाजार समितीच्या सेवकांनी गर्दी कमी करण्यासाठी लिलाव प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली.

Onion Rate
Onion Market : उन्हाळ कांद्याच्या दरात मागणीमुळे सुधारणा

यावेळी क्षीरसागर म्हणाले की, सध्या पावसाचे दिवस आहेत यामुळे खरीप पिकाच्या लागवडीचा हंगाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे शेतकरी बांधवांना मशागतीचे कामे, बी-बियाणे, रासायनिक खते, औषधे इ. कामांसाठी पैशांची निकड भासत आहे.

त्यामुळे येथील बाजार समितीत उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असून, आलेल्या सर्व आवकेचे त्याच दिवशी लिलाव पूर्ण करून शेतकरी बांधवांना रोख चुकवती केली जात आहे. दरम्यान मागच्या दोन दिवसांपासून बाजार समितीत १० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती देण्यात आली.

लासलगाव बाजारसमिती पाठोपाठ निफाडची बाजारसमिती कांद्याची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. दरम्यान निफाड उपबाजार परिसरात ६८६ वाहनांमधून ६ हजार ६०० क्विंटल कांदा विक्रीस आला होता. या समितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लहान कांद्याला ५०० तर मध्यम कांद्याला १३०० रूपयांच्या आसपास तर मोठ्या कांद्याला १७०० रूपये दर देण्यात आला.

तसेच विंचूर उपबाजार परिसरातही कांद्याची सर्वाधिक आवक झाली. येथे १५६१ वाहनांमधून २८ हजार ५०० क्विंटल कांदा विक्रीस आला होता. याठिकाणी ६०० रूपये १४०० रूपये आणि १९०० रूपये असा कांद्याला भाव देण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com