Grape Research Center : द्राक्ष संशोधन केंद्राच्या शिफारशींची अंमलबजावणी गरजेची

Grape Farming : यावेळी बारामती, इंदापूर व माळशिरस भागातील द्राक्ष उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
Grape Vine Yard Management
Grape Vine Yard ManagementAgrowon
Published on
Updated on

Pune News : ''द्राक्ष संशोधन केंद्राच्या शिफारशींची काटेकोरपणे अवलंबजावणी केल्यास द्राक्ष बागायतदारांना निश्चितच गतवैभव प्राप्त होईल,'' असे प्रतिपादन राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रामहरी सोमकुंवर यांनी केले.

इंदापूर येथे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी, पुणे व महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्र इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील आय. एम. ए.चे डॉ. नीतू मांडके सभागृहामध्ये पूर्व हंगामी द्राक्ष फळ छाटणी चर्चासत्राचे आयोजन केले होते.

Grape Vine Yard Management
Grape Traders : द्राक्ष व्यापाऱ्यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला

यावेळी बारामती, इंदापूर व माळशिरस भागातील द्राक्ष उत्पादक शेतकरी उपस्थित होते. द्राक्ष काडी पक्वता, काडीमधील घडनिर्मिती, द्राक्ष छाटणी, वांझ काडी विरळणी, द्राक्षमणी विरळणी, द्राक्ष मणी पक्वता, निर्यातक्षम द्राक्षाच्या गुणवत्तेचे निकष इत्यादी बाबत द्राक्ष बागायतदारांना मार्गदर्शन करण्यात आले.

Grape Vine Yard Management
Grape Management : सद्यःस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन

यावेळी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे मृदा शास्त्रज्ञ डॉ.अजय उपाध्याय यांनी द्राक्ष बागेसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन व पाणी व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्राचे संचालक राजेंद्र वाघमोडे यांनी द्राक्षाचे प्रतिएकरी उत्पादन, द्राक्षाची प्रत, उत्पादन खर्च व विक्री व्यवस्था याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी बारामती, इंदापूर तसेच आजूबाजूच्या भागातील शेतकऱ्यांसाठी लिखित स्वरूपात पाठवलेला मार्च २०२४ पर्यंतचा पावसाचा अंदाज वाचून दाखवण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com