Banana Damage : रावेरच्या केळी नुकसानीचा अहवाल सादर

Banana Crop Damage : कृषी विभागातील कमी कर्मचारी संख्याबळ असल्यामुळे तब्बल एक महिना वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यास लागला.
banana damage
banana damage Agrowon
Published on
Updated on

Jalgaon News : तालुक्यात आठ जूनला चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे ३४ गाव शिवारातील २२०० हेक्टर क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या केळी पिकाचे सुमारे ९९ कोटीच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ पंचनामे पूर्ण होऊन अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आला आहे.

तालुक्यात ८ जूनच्या सायंकाळी जोरदार चक्रीवादळासह पावसाचा तडाखा बसला होता. यामुळे शेतकऱ्यांच्या कापणीवर आलेले केळी पीक जमीनदोस्त होऊन हातातोंडाशी आलेला घास हिरवला होता. कृषी विभागातील कमी कर्मचारी संख्याबळ असल्यामुळे तब्बल एक महिना वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यास लागला.

banana damage
Banana Market : खानदेशात केळी आवक आणि दर स्थिर

या चक्रीवादळाचा तडाख्यात रावेर, खिरोदा प्र. रावेर, आहिरवाडी, मंगरूळ व मुंजलवाडी येथील केळी पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले. मे व जून महिन्यात तब्बल पाच वेळा वादळी वाऱ्यासह गारपीट, पावसाचा तडाखा बसला.

यामुळे तालुक्यातील केळी पीक मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त होऊन केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

रावेर तालुक्यातील नुकसानग्रस्त गावे व शेतकऱ्यांची संख्या पुढीलप्रमाणे : रावेर - ३८५, खिरोदा (प्रगणे रावेर) २६१, अहिरवाडी - १८५, मंगरूळ -२०४, मुंजलवाडी -१२४, निरूळ -१६९, कुसुंबा बुद्रूक -११५, पिंप्री - ८९, केऱ्हाळे खुर्द -८९, मोहगण - ९८, पाडळे बुद्रूक -१०५, केऱ्हाळे बुद्रूक -६५, कुसुंबा खुर्द - ६५, रसलपूर - ८८, उटखेडा - ९४, अभोडा बुद्रूक -४६, पाडळे खुर्द -६६,

banana damage
Banana Export : केळीची आखातातील निर्यात निम्म्याने घटली

खानापूर - ५४, जिन्सी - ३४, भाटखेडा - ७३, नांदुरखेडा - २८, जुनोने - १९, कर्जोद -२८, अजनाड- २७, पुनखेडा- ०३, चोरवड - १३, होळ - १३, अभोडा खुर्द - ०७, भोर - ०९, विवरे बुद्रूक -११, भोकरी - ०१, वाघोड - ०१, पातोंडी - ०२. अशा ३४ गाव शिवारातील २७३९ शेतकऱ्यांच्या २२३०.

५३ हेक्टर क्षेत्रातील केळी पिकांचे एकूण ९९ कोटी, १२ लाख ४७ हजार, ५३२ रुपयांचे नुकसानीचा पंचनामा महसूल, पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी करून सदर अहवाल वरिष्ठांना सादर केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com