Irrigation : तळोद्यातील रापापूर प्रकल्प मार्गी लागणार

रापापूर लघुपाटबंधारे योजनेतील सिंचन प्रकल्पाला १९९८ मध्ये मंजुरी मिळून मार्च २००३ मध्ये १५ कोटी २२ लख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.
Irrigation
IrrigationAgrowon

तळोदा, जि. नंदुरबार ः १९९८ मध्ये मंजुरी मिळालेला व २४ वर्षांपासून निधीअभावी रखडलेल्या रापापूर सिंचन प्रकल्पाचे (Rapapur Irrigation Project) लेखाशीर्ष बदलून सरदार सरोवर प्रकल्प, धुळे पाटबंधारे प्रकल्प मंडळ व वीज प्रकल्पावरील मोठी बांधकामे या उद्दिष्टाखाली शासनाच्या मंजूर अनुदानातून (Subsidy) प्रकल्पाचे बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे सिंचन प्रकल्पाचे रखडलेले काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पाच्या कामाला आतातरी पूर्ण निधी मिळावा व कामाला गती येऊन प्रकल्प पूर्ण व्हावा, अशी अपेक्षा तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Irrigation
Irrigation : पाणी वापर संस्था कागदोपत्रीच

रापापूर लघुपाटबंधारे योजनेतील सिंचन प्रकल्पाला १९९८ मध्ये मंजुरी मिळून मार्च २००३ मध्ये १५ कोटी २२ लख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. मात्र भूसंपादन करण्यासाठी लागलेला वाढीव खर्च व प्रकल्पाच्या संकल्पचित्रात बदल झाल्यामुळे योजनेच्या खर्च वाढत होता. त्यामुळे प्रकल्पाचे कामच बंद पडले होते. या प्रकल्पामुळे तालुक्यातील एक हजार पाचशे हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.

Irrigation
Rabi Irrigation : निम्न दुधना प्रकल्पातून रब्बीसाठी चार आवर्तने

तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी या प्रकल्पाचे काम सुरू होण्याकरिता शासनाकडे मागणी लावून धरली होती. त्यामुळे २०१७ मध्ये रापापूर सिंचन प्रकल्पासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येऊन प्रकल्पाचा अंदाजित खर्च ५८ कोटी सात लाख ६५ हजार रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली होती.

त्या वेळी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लहान सिंचन योजना व तापी पाटबंधारे विकास महामंडळ व इतर योजनेच्या लेखाशीर्षाखालील असलेल्या शासनाच्या मंजूर अनुदानातून हा खर्च भागविण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र तरीदेखील निधीअभावी प्रकल्पाचे काम पूर्ण होऊ शकले नाही.

आता २२ नोव्हेंबरला शासनाने रापापूर सिंचन प्रकल्पाच्या मंजूर खर्चासाठी लेखाशीर्ष बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वीज प्रकल्पावरील खर्च, सरदार सरोवर प्रकल्प, धुळे पाटबंधारे प्रकल्प मंडळ मोठी बांधकामे या उद्दिष्टाखाली असलेल्या लेखाशीर्षामधून हा खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचे काम आतातरी सुरू होऊन प्रकल्पाला वेळेवर पूर्ण निधी मिळावा व प्रकल्प पूर्ण व्हावा, अशी अपेक्षा आहे.

चोवीस वर्षांत ३५ टक्के काम

रापापूर सिंचन प्रकल्प गोऱ्यामाळ टेकडीजवळ असलेल्या नदीवर बांधण्यात येत आहे. २४ वर्षांत या प्रकल्पाचे केवळ ३० ते ३५ टक्के काम झाले आहे. त्यात सांडव्याची भिंत व पिचिंगचे काम झाले आहे. मुख्य भिंतीचे काम होणे बाकी आहे. निधीच मिळत नसल्याने प्रकल्प रखडत होता. आतातरी निधी वेळेवर मिळून प्रकल्पाचे काम सुरू व्हावे, अशी मागणी रापापूरसह अमोनी, रेवानगर, धवळीविहीर, चौगाव, दलेलपूर व तळोदा येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com