Sugar Factories Kolhapur Sangli : साखर कारखान्यांनी गेल्या हंगामात गाळप झालेल्या उसाचे ४०० रुपये द्यावेत यासाठी आम्ही साखर कारखान्यांच्या दारात पायी जावून आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी(ता. २) दिली.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सर्व कारखान्यांवर १७ ऑक्टोबर ते ०७ नोव्हेंबर या कालावधीत ही पदयात्रा निघेल. ७ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथे होणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत पदयात्रेची सांगता होईल. याच परिषदेत यंदाच्या हंगामात कोणती भूमिका घ्यायची हा निर्णय होईल असे श्री शेट्टी यांनी सांगितले. आम्ही दिलेल्या मुदतीत ही रक्क्म न दिल्याने आम्ही आज (ता.३) तातडीने दोन्ही जिल्ह्यातील साखरेची वाहतूक अडवणार असल्याचेही श्री शेट्टी यांनी जाहीर केले.
गेल्या वर्षी तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता प्रतिटन 400 रूपये तातडीने द्या या मागणीसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी मागच्या काही दिवसांपूर्वी साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावर आज (ता.०२) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील कारखान्यावर ढोल बजावो आंदोलन करण्यात आले.
याचबरोबर माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेत साखर कारखानदारांच्या दारात जात आत्मक्लेश आंदोलन करण्याची घोषणा केली. १७ ऑक्टोबर ते ०७ नोव्हेंबर दरम्यान कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील कारखानदारांच्या दारात जाणार असल्याची माहिती दिली.
दरम्यान यावेळी माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, मागच्या वर्षी तुटलेल्या उसाचा दुसरा हफ्ता ४०० रूपये द्या ही आमची मागणी आहे. सध्या साखरेचे दर वाढले आहेत तसेच उसापासून होणाऱ्या उपपदार्थांचेही दर वाढल्याने साखर कारखानदारांना यंदा ४०० रुपये भाव देण्यास सहज शक्य आहे.
पुणे जिल्ह्यातील साखर कारखानदारांना ४०० रूपये जादा दर देऊन हे सहज शक्य असल्याचे पहिलाच सिद्ध केले आहे. परंतु कोल्हापूर, सांगलीसह राज्यातील अन्य कारखानदारांनी यावर कोणताही निर्णय घेतला नसल्याने आम्ही आंदोलनाची पुढची दिशा म्हणून आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली.
माजी खासदार शेट्टी पुढे म्हणाले की, उद्यापासून साखर कारखान्यांमधून बाहेर पडणारी साखर आणि त्याचे उपपदार्थ आम्ही अडवणार आहे. यामुळे माझी ट्रान्सपोर्ट कंपन्यांना विनंती आहे आमच्या कार्यकर्त्यांनी साखर आडवल्यानंतर काही झाले तर संघटना जबाबदार राहणार नाही. हे आंदोलन आम्ही उद्यापासून सुरू करणार आहे.
आम्ही केलेल्या मागणीमध्ये काही चुकीचे नाही हे वेळोवेळी आम्ही सिद्ध करून दाखवलं आहे. परंतु कारखानदारांना सरकार पाठीशी घालणार असेल तर आज गांधी जयंती आहे महात्मा गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कोणी फसवलं तर तुम्ही स्वत: आत्मक्लेश द्या जेणेकरून ज्याने तुमच्यावर अन्याय केला आहे त्यास जनाचीनाहीतर मानची लाज बाळगून तुन्हाला तो पैसे देईल यामागणीसाठी मी १७ ऑक्टोबर ते ०७ नोव्हेंबर मी आत्मक्लेश आंदोलनाला सुरूवात करत असल्याची घोषणा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
दरम्यान कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील दत्त साखर शिरोळ, गुरूदत्त, जवाहर, शाहू, सदाशिवराव मंडलिक साखर कारखाना, संताजी घोरपडे, बिद्री, भोगावती, कुंभी कासारी, दालमिया, वारणा, बांबवडे, चिखली, निनाईदेवी, वाटेगाव, कृष्णा, राजारामबापू, जी डी बापू लाड, वाळवा हुतात्मा, सांगली सहकारी, सर्वोदय, शरद, पंचगंगा यानंतर ०७ नोव्हेंबर रोजी थेट आम्ही ऊस परिषदेला पोहोचणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली.
अशाप्रकारची आमची आत्मक्लेश यात्रा आहे. याकाळात मी स्वत: कोणत्याही वाहनाला २२ दिवस हात लावता चालत राहणार आहे. याचबरोबर २२ व्या ऊस परिषद होणार आहे म्हणून २२ दिवस आत्मक्लेश करणार असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली. याचबरोबर उसाच्या पुढच्या आंदोलनाची दिशा ०७ नोव्हेंबरला रोजी करणार आहे असे शेट्टी म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.