
IMD issues alert : राज्यातील काही भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत कमी पाऊस असलेल्या भागातील पिकांना पावसाची नितांत गरज आहे. पण मागील दोन दिवसांमध्ये राज्यातील सर्वच भागांमध्ये पाऊस थांबला. आज हवामान विभागाने पुढील पाच दिवसांचा अंदाज दिला. राज्यात पावसाची उघडीप कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला.
देशातील अनेक भागांमध्ये पाऊस कमी झालेला दिसतो. सध्या उत्तर बांगलादेशच्या भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर असून दक्षिणेकडे झुकलेली आहे. माॅन्सूनचा आस असलेल्या कमी दाब पट्ट्याचा पूर्व भाग हिमालयाच्या पायथ्याशी आहे. तर पूर्वेकडील भाग बहारिच, गोरखपूर, सपौल, कूच बिहारपासून पूर्व मनिपूरपर्यंत पसरला आहे. उत्तर गुजरात आणि शेजारच्या भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर आहे.
राज्यात बहुतांशी भागात दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. पावसानं उडीप दिल्यामुळं शेतकरी आंतरमशागतीच्या कामात व्यक्त आहेत. तर कमी पाऊस असलेल्या भागात पिकांना पावसाची गरज आहे. जुलै महिन्यात जालना, सातारा, सोलापूर, पुणे, बीड, नगर आदी अनेक जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये जुलै महिन्यातही पुरेसा पाऊस झाला नव्हता. या भागांमध्ये आता पिकांची स्थिती नाजूक झाली. यामुळे पावसाची गरज आहे.
हवामान विभागाने आज पुढील पाच दिवसांचा अंदाज जाहीर केला. या अंदाजात पुढील पाचही दिवस पावसाची उघडीप कायम राहण्याचा अंदाज आहे. दोन दिवसांपासून राज्यात पावसाची उघडीप आहे. काही ठिकाणी हलक्या सरी होतात पण जोरदार पाऊस नाही. पुढील पाच दिवस काही ठिकामी हलक्या सरी पडतील. पण सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.