Maharashtra Rain Update : कोकण, पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात

Latest Rain Update : राज्यातील काही भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे पुन्हा पावसास सुरुवात झाली आहे.
Rain
RainAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील काही भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे पुन्हा पावसास सुरुवात झाली आहे. कोकण, घाटमाथ्यावर आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढू लागला आहे.

खानदेशातील काही भागात ढगाळ वातावरणाची स्थिती कायम आहे. मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भात हलक्या सरी पडल्या असून अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात पेरण्या खोळंबल्याची स्थिती आहे.

राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. घाटमाथ्यावरही पावसाचा प्रभाव कमी झाला होता. मात्र आता पुन्हा पावसाचा जोर वाढू लागला आहे. सोमवारी (ता. १७) सकाळी आठ वाजेपर्यंत डुंगरवाडी या घाटमाथ्यावर १२७ मिलिमीटर पाऊस पडला. तर दावडी व ताम्हिणी ११२ मिलिमीटर, भिरा ९६, कोयना- पोफळी ८७, भिवपुरी ८७, खोपोली ५५, कोयना - नवजा ५४ मिलिमीटर पाऊस पडला. तर धारावी, आंबोणे, शिरगाव, ठोकरवाडी, शिरोटा, वळवण, लोणावळा या घाटमाथ्यावर हलक्या ते मध्यम सरी पडत होत्या.

Rain
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा जोर

कोकणातील ठाणे, पालघर जिल्ह्यांतील अनेक भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. या भागातील हमरापूर, वाशी, कोपरोळी ७९.८ मिलिमीटर पाऊस पडला. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून अनेक ठिकाणी तुरळक सरी बरसल्या.

तर पोयंजे ६८.०, तितवाला ६७.३, नेरळ ६४.५, कळकवने, शिरगाव ६२.८, करनाळा ६०.३ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे भात पिकांना दिलासा मिळाला. मध्य महाराष्ट्रातील खानदेशात अनेक भागात उघडिप असून तुरळक ठिकाणी शिडकावा झाला.

नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर भागांत ढगाळ वातावरण आहे. तर तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्या. तर हेलवाक येथे १०३.५, मोरगिरी १०३.५, वेल्हा ८४.०, चंदगड ७०.८, मिलिमीटर पाऊस पडला असला तरी अनेक ठिकाणी पाऊस नसल्याने पिके सुकू लागली आहेत.

मराठवाड्यातील लातूरमधील निलंगा ३९, हसनाबाद ३७, लातूर, बाभळगाव, हरणगुळ ३६ मिलिमीटर पाऊस पडला. तर काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या असल्याने वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना दिलासा मिळत आहे. विदर्भाच्या पश्चिम भागात अमरावती, बुलडाणा, वाशीम, वर्धा, यवतमाळ भागात तुरळक ठिकाणी शिडकावा झाला. तर पूर्व विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.

या भागातील वरथी मंडळात १०६, शंक्रापूर १००.३, भंडारा ८८, कमलापूर ६४.३, बारव्हा ६०.८, कुरखेडा ६०.३, बेला ५८,खोकार्ला ५८, बोदगावदेवी ५८, अर्जुनी मोरगाव ५६.५ मिलिमीटर पाऊस पडला. अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. त्यामुळे धान पिकांना व कपाशी, सोयाबीन पिकांना दिलासा मिळाला आहे.

Rain
Vidarbha Rain Update : पूर्व विदर्भात दमदार पाऊस

सोमवारी (ता. १७) सकाळी आठ वाजेपर्यंत मंडलनिहाय झालेला पाऊस, मिलिमीटर (स्रोत - कृषी विभाग)

कोकण - न्याहदी ५६.८, दिघाशी ५३.५, पडघा ५३.५, शाहपूर ५३.८, किनवली, वाशीद, डोलखांब ५३.८, पनवेल ५१.८, मोराबे ५७.८, काडव ५७.३, कळंब ५५.३, कशाळे ४६.८, उरण ५२.३, जसाई ५४, बिरवडी ५६.८, खारवली ५६.८, मेढा ५१.८, आगाशी ४४, विरार ४२, वाडा, कडूस, कोने, कांचद, मनोर ५९, जव्हार ३७, खोडाला ३४.५, विक्रमगड ३७.३,

मध्य महाराष्ट्र - माले ४२.०, भोलावडे ५९.५, निगुडघर ५०.८, काळे कॉलनी ३६.५, लोणावळा २७.८, पानशेत २७.३, परली २९.५, बामनोली २७, महाबळेश्वर ५३.०, तापोळा २९.५, लामज ५४.०, गारगोटी २८.३, कडगाव ४३.३, कराडवाडी २९, मानगाव ३८.३, हेरे ३९.०,

मराठवाडा - कन्नड, चापनेर, चिखलठाणा ३०, कुंभारझरी २८.५, पाटोदा २२.५, सिरसाळा २४.३, कासारखेडा २६.३, कनेरी २४.८, औसा २४, बाडा २४, नितूर २७.५, हळगरा २९.८, आंबुळगा ३०.५, महाकोळी २६.५,

विदर्भ - मेहूनाराजा २८.५, किनगाव राजा ४३.५, लोणार ३१, हर्डाव ३१, मालखेड २९.५, नागपूर, सिताबर्डी ५०, पाचगाव ५३.५, शहापूर ५३.३, धारगाव ४८, पहेला ४३.८, मोहाडी ३३.३, कन्हळगाव ३३.३, आढळगाव ३४, मितेवानी ३६.५, गार्हा बघेडा ३६.५, देवडी २७, लाखंदूर २४.३, बाघडी ३५, मुरमोदी ३३.३, चिंचगड ४६.३, घोथागाव ३३.३, गंगाळवाडी ३१.८, पुराडा ३५.८, काढोली ४८.३, माळेवाडा ४२.८, कोर्ची ३३.३, बेडगाव ४४.३, मासेली ३७.३, देसाईगंज ४३.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com