Vidarbha Rain Update : पूर्व विदर्भात दमदार पाऊस

Vidarbha Monsoon Update : पूर्व विदर्भात दमदार पावसाने हजेरी लावली असून, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.
Rain
RainAgrowon
Published on
Updated on

Vidarbha Latest Rain News : पूर्व विदर्भात दमदार पावसाने हजेरी लावली असून, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. रविवारी (ता. १६) सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली आहे.

Rain
Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस

चंद्रपूर जिल्ह्यातील सावळी येथे सर्वाधिक १४० मिलिमीटर, नागभिड येथे १२० मिलिमीटर, तर गडचिरोली येथे ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. घाटमाथ्यावरही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला.

रविवारी (ता. १६) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत ः हवामान विभाग) :

कोकण :

मुरबाड, तळा, शहापूर, वाडा प्रत्येकी ५०, वैभववाडी ४०, अंबरनाथ, जव्हार, माथेरान, राजापूर प्रत्येकी ३०.

Rain
Maharashtra Rain Update : कोकण, घाटमाथ्यावर जोर, विदर्भातही हजेरी

मध्य महाराष्ट्र :

गगनबावडा, अक्कलकुवा, इगतपुरी, राधानगरी, लोणावळा प्रत्येकी ५०, पाचोरा, महाबळेश्‍वर, पेठ, शाहूवाडी, हर्सूल प्रत्येकी ४०, ओझरखेडा, शिरपूर प्रत्येकी ३०.

मराठवाडा :

खुलताबाद, परभणी प्रत्येकी ३०, सेनगाव, भेकरदन, निलंगा, माहूर, कळमनुरी प्रत्येकी २०.

विदर्भ :

सावळी १४०, नागभिड १२०, गडचिरोली ११०, देसाईगंज, सडकअर्जूनी, गोंदिया, ब्रह्मपुरी प्रत्येकी ९०, चामोर्शी, धानोरा, अरमोरी, कुरखेडा, आमगाव, कोर्ची, सालकेसा प्रत्येकी ८०, कुही, शिंदेवाही, देवरी, मुलचेरा, पोंभुर्णा, गोंदिया प्रत्येकी ७०, मुल, गोरेगाव, अर्जुनीमोरगाव, एटापल्ली, भिवपूर प्रत्येकी ६०, साकोली, पवनी, लाखनी, अहेरी प्रत्येकी ५०.

घाटमाथा :

दावडी ९०, शिरगाव ८०, कोयना ७०, लोणावळा ६०, वळवण, अंभोणे प्रत्येकी ४०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com