Maharashtra Rain Update : कोकणासह विदर्भात पावसाचा शिडकावा

Maharashtra Rain News : राज्यातील काही भागांत तुरळक सरी कोसळल्या. कोकण, घाटमाथ्यावर आणि पूर्व विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस झाला.
Rain
RainAgrowon

Pune News : राज्यातील काही भागांत तुरळक सरी कोसळल्या. कोकण, घाटमाथ्यावर आणि पूर्व विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस झाला. घाटमाथ्यावर काही प्रमाणात मध्यम पाऊस झाला. ‘कोयना नवजा’ घाटमाथ्यावर ११६ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. खानदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात उन्हासह अधूनमधून ढगाळ वातावरण राहिले.

गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. पोषक वातावरण नसल्याने पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याची स्थिती आहे. त्यामुळे जमिनीतील ओल कमी होऊ लागली आहे. हलक्या जमिनीत वाफसा स्थिती आहे.

परंतु खानदेश, मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग, मराठवाड्यातील नांदेड जिल्हा वगळता उर्वरित भाग व पश्चिम विदर्भात अजूनही फारसा जोरदार पाऊस नाही. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे खरीप हंगाम अडचणीत येत असताना शेतकरी चिंतेत सापडला आहे.

Rain
Maharashtra Rain Update : राज्यात हलक्या पावसाचा अंदाज

सध्या राज्यातील अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस पडला. रायगडमधील कर्नाळा, कर्जत, चौक, वौशी, खोपोली, पाली, जांभूळपाडा, पेण, रोहा, नागोठणे, रत्नागिरीमधील मंडणगड, मालगुंड, आंगवली, कोंडगाव, देवरुख, लांजा, भांबेड, पुनस, पालघरमधील डहाणू, कसा, मनोर, जव्हार, खोडला अशा काही मंडलांत हलका पाऊस पडला.

मध्य महाराष्ट्रातील नाशिकमधील वाडीवऱ्हे, धारगाव, नंदूरबारमधील मोलगी, वडफळी, पुणे जिल्ह्यांतील काले, कार्ला, खडकाळा, कोल्हापुरातील आंबा, कसबा, गगनबावडा, साळवण, कडगाव, कराडवाडी मंडलांत हलका पाऊस झाला.

Rain
Rain Alert Maharashtra : पाऊस गायब होणार का? हवामान खात्याने दिला अंदाज

यवतमाळ, गोंदिया, गडचिरोलीत शिडकावा

विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात पहापल, चालबर्डी, गोंदियातील रावणवाडी, कामठा, कुदवा, काट्टीपूर, गडचिरोलीतील अहेरी, आलापल्ली, पेरमिली, मुरूमगाव, देसाईगंज, शंकरपूर या मंडलांत मध्यम पाऊस झाला.

राज्यात शनिवारी (ता.५) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांतील मंडलनिहाय पाऊस (मिलिमीटर)

कोकण : विलवडे २१.३ श्रावण, पोइप २०.८, कणकवली, वागदे २८.८, वैभववाडी, भुईबावडा २०.८, सौंदळ ३९.८, तळकट ३०.३, भेडशी ४१.३

मध्य महाराष्ट्र : भोलावडे ३७.५, वडगाव मावळ ३०.५, लोणावळा ३६.५, वेल्हा ४८.३, पाईट ३०.५, बामणोली २९.३

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com