Bhendwal Ghat Mandani
Bhendwal Ghat MandaniAgrowon

Bhendwal Ghat Mandani : यंदा पाऊस, पीक परिस्थिती सर्वसाधारण

सुमारे ३५० वर्षांपूर्वी चंद्रभान महाराजांनी सुरू केलेल्या भेंडवळ मांडणीची परंपरा आजही कायम आहे.
Published on

Buldana News सुमारे ३५० वर्षांपूर्वी चंद्रभान महाराजांनी सुरू केलेल्या भेंडवळ मांडणीची परंपरा आजही कायम आहे. अक्षय तृतीयेच्या (Akshay Tritiya) या मांडणीचे भाकित रविवारी (ता.२३) चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि त्यांचे सहकारी सारंगधर महाराज यांनी पहाटे पाच वाजता जाहीर केले.

त्यानुसार या वर्षात पाऊस पहिल्या महिन्यात कमी, दुसऱ्या महिन्यात सर्वसाधारण, तिसऱ्या महिन्यात जास्त आणि चौथ्या महिन्यात कमी येईल, असा अंदाज आहे. पण अवकाळीची शक्यता जास्त राहील. त्यामुळे पीक परिस्थिती सर्वसाधारण राहील.

Bhendwal Ghat Mandani
Rain Forecast : राज्यावर वादळी पावसाचे सावट कायम

दीर्घकालीन पिके तूर, हरभरा, गहू ही चांगली येतील. तर मूग, उडदासारख्या अल्पकालीन पिकांचे नुकसान संभवते. देशाची आर्थिक परिस्थिती चांगली असेल, चारापाणी मुबलक प्रमाणात असेल. अतिवृष्टीमुळे चाऱ्याची नासाडी संभवते.

भूकंप, अतिवृष्टी, महापूरसुद्धा काही भागांत येऊ शकतात. काही परिसरांत पिके ही चांगल्या प्रकारे, तर काही परिसरातील पिके ही अत्यंत कमी प्रमाणात येतील, असे भेंडवळच्या घट मांडणीचे भाकित आहे.

Bhendwal Ghat Mandani
Rain Prediction : या वर्षीचा पाऊस कसा असणार?

कपाशी पीक स्थिती सर्वशाधारणच

कपाशीचे पीक काही भागांत चांगले, तर काही भागात कमी प्रमाणात येईल. भावात फारशी तेजी राहणार नाही. ज्वारीसुद्धा सर्वसाधारण राहील. परंतु बाजारामध्ये तेजी राहील.

तुरीची पीक परिस्थिती चांगली राहील. मूग आणि उडीद पीक हे सर्वसाधारण स्वरूपाचे राहील. तिळाच्या पिकाची काही भागांत अतिवृष्टीमुळे नासाडी संभवते.

बाजरीचे पीक सर्वसाधारण राहील. साळी, अर्थात तांदळाचे पीक हे चांगल्या प्रकारे असून, भावात तेजी संभवते. मटकीचे पीक हे सर्वसाधारण असून भावात तेजी राहील. वाटाण्याच्या भावात तेजी राहील. गव्हाचे पीक सर्वसाधारण राहील. हरभऱ्याचे पीक हे अनिश्‍चित स्वरूपाचे राहील.

पारावरच्या मांडणीत हे वर्ष विषारी

यापूर्वी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गावातील हनुमान मंदिराच्या पारावर नऊ खंडांची घट मांडणी करण्यात आली होती. या मांडणीमध्ये करवा पाण्याने पूर्ण भरून त्यावर गंगाळ उलटे ठेवून मातीने लिपले जाते. चैत्र शुद्ध दशमीला ही मांडणी उघडली जाते.

या वर्षी पारावरील घटामध्ये झुरळ, म्हैस, विंचू, पिशवा, गाढव, वसू असे कीटक आढळून आले. सुमारे ४५ वर्षांच्या इतिहासात विंचू हा प्रथमच या मांडणी भोवती दिसला. त्यामुळे हे वर्ष विषारी वर्ष असेल असे या वेळी सारंगधर वाघ यांनी विश्‍लेषण केले. वाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात आढळल्याने या वर्षी वाण्यांपासून पिकाला नुकसान जास्त प्रमाणात संभवते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com