
Parbhani News : दीर्घ खंडांनंतर परभणी व हिंगोली जिल्ह्यातील ८२ मंडलांत गुरुवारी (ता. ७) सकाळी दहा पर्यंतच्या २४ तासांत हलका ते मध्यम पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात सरासरी १०.१ मिलिमीटर तर हिंगोली जिल्ह्यात सरासरी ८.९ मिलिमीटर पाऊस झाला.
परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम पूर्णा ९ तालुक्यातील ५२ मंडलात हलका ते मध्यम पाऊस झाला. अनेक भागात बुधवारी (ता. ६) दुपारनंतर सुरू झालेला पाऊस रात्री उशीरा पर्यंत सुरू राहिला. अनेक भागात गुरुवारी सकाळी भुरभुर पाऊस सुरू होता.
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १०.१ मिलिमीटर तर सप्टेंबर महिन्यात आजवर एकूण सरासरी १६.६ मिलिमीटर (४२.१ टक्के )पाऊस झाला. यंदा १ जून पासून आजवर एकूण सरासरी ३५५.४ मिलिमीटर (५६.३टक्के )पाऊस झाला आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यातील ३० मंडलात हलका ते जोरदार पाऊस झाला.
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ८.९ मिलिमीटर तर सप्टेंबर महिन्यात आजवर एकूण सरासरी १७.३ मिलिमीटर (४७.९ टक्के) पाऊस झाला. यंदा १ जून पासून आजवर आजवर एकूण सरासरी ५२५.३ मिलिमीटर (७७.६ टक्के) पाऊस झाला.
मंडलनिहाय पाऊस स्थिती (५ मिलिमीटरच्या पुढे)
परभणी जिल्हा ः परभणी ११.८, पेडगाव ६.५, जांब १७, सिंगणापूर१७, दैठणा १३, पिंगळी ८, बोरी ६.५, आडगाव १३.३, चारठाणा ७.३, सेलू ५.३, वालूर ९.३, कुपटा २१.५, चिकलठाणा ७.३, मोरेगाव १३.३, मानवत ७.८, कोल्हा १२, ताडबोरगाव २८.३, रामपुरी १२, पाथरी १०, हादगाव ५, कासापुरी ९, गंगाखेड १४.३, महातपुरी १०.८, माखणी ६.८, पालम १८.८, चाटोरी १४, बनवस १२, पेठशिवणी १८.३, रावराजूर १९.३, ताडकळस ३५.५, लिमला १७.८, कात्नेश्वर ५.३.
हिंगोली जिल्हा ः नरसी नामदेव १२, सिरसम ७.५, माळहिवरा ५, खंबाळा ७.३, डोंगरकडा २१.५, वारंगा २०, वसमत १५.८, आंबा ८.८, हयातनगर ८.३, गिरगाव ९.८, हट्टा ६.८, टेंभुर्णी १५.८, कुरुंदा २२.८, औंढा नागनाथ ९.५, येळेगाव ६.५, साळणा ९.५, जवळा बाजार २४.५, सेनगाव १०.३, गोरेगाव ६, आजेगाव ६.५, पानकनेरगाव ७.३.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.