Weather Update : उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.
Rain Updates
Rain UpdatesAgrowon
Published on
Updated on

पुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाने शनिवारी (ता. १७) काहीशी उसंत घेतली. आज उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.(Heavy Rainfall) तर पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) (Yellow Alert) देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेले आहे. मॉन्सूनचा (Monsoon Rain) आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या गंगानगर, हिस्सार, मेरठ, लखनौ, गया, दिघा ते आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.

Rain Updates
Monsoon Bulletin :कोणत्या भागात पडणार जोरदार पाऊस ? | ॲग्रोवन

पूर्व मध्य अरबी समुद्र ते गुजरात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरात ओडिशाच्या किनाऱ्यालगत मंगळवारपर्यंत (ता. २०) या भागात नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे. राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असून, उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. १८) महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाचा तसेच उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : पुणे. विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, औरंगाबाद, परभणी, हिंगोली, जालना, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली.

कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार कोकण आणि मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर शुक्रवारी (ता. १६) पावसाचा जोर अधिक असल्याचे दिसून आले. शनिवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे सर्वाधिक १६५ मिलिमीटर तर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे १५७ मिलिमीटर पाऊस पडला. विदर्भात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडला.

शनिवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण : मुंबई शहर : कुलाबा ४७, पालघर : डहाणू ४९, जव्हार ४३, पालघर ४८, तलासरी ८८, वसई १४५, वाडा ७०. रायगड : भिरा १०३, कर्जत १०३, माथेरान ११५, म्हसळा ४४, मुरूड ४६, पनवेल १०५, पेण ९५, सुधागडपाली ८४, तळा १०२, उरण ६९. रत्नागिरी : दापोली ५४, ठाणे : आंबरनाथ १२८, भिवंडी १६५, कल्याण ७९, मुरबाड ११५, शहापूर ११४, ठाणे ९८, उल्हासनगर १७५.

Rain Updates
Cotton Market : कापसाला बसतोय अतिपावसाचा फटका ?| Agrowon

मध्य महाराष्ट्र : नगर : अकोले ७९, श्रीरामपूर ४७.

धुळे : शिरपूर ४१.

जळगाव : चाळीसगाव ४६, धरणगाव ५२, एरंडोल ६२.

कोल्हापूर : गगनबावडा ४०.

नाशिक : इगतपुरी १५७, ओझरखेडा ५९, पेठ ५६, त्र्यंबकेश्वर ६५.

पुणे : घोडेगाव ७५, चिंचवड ४५, जुन्नर ६०, लोणावळा कृषी ९३, पौड ७८, तळेगाव ४१, वडगाव मावळ ४७, वेल्हे ४९.

सातारा : महाबळेश्वर ४५.

विदर्भ : अकोला : तेल्हारा ५१,

भंडारा : मोहाडी ४४.

बुलडाणा : संग्रामपूर ५०.

पुणे ः रविवारी (ता.१८) राज्यातील पावसाचा इशारा

(सौजन्य : हवामान विभाग).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com