Satara Rain News : जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून, २४ तासांत सरासरी ९.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जावळी, पाटण, महाबळेश्वर या तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून इतर हलका पाऊस झाला आहे.
कोयना धरण क्षेत्रातही पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. धरण क्षेत्रातील कोयना ८४, नवजा ९५, महाबळेश्वर १०३ मिलिमीटर पाऊस झाला असून धरणात ३७,३०९ क्युसेक पाण्याची आवक होत आहे.
धरणात एकूण ४०.७८ टीएमसी, तर उपयुक्त ३५.६२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील सर्व धरणांत एकूण ५७.४५ टीएमसी पाणीसाठा असून धरणांमधील पाणीसाठा एकूण क्षमतेच्या ३८.५९ टक्के इतका झाला आहे. जिल्ह्यात पश्चिमेकडील महाबळेश्वर, पाटण, जावळी या तालुक्यांत गुरुवारी (ता.२०) मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून इतर सर्व तालुक्यात हलका ते तुरळक पाऊस सुरू आहे.
हा पिकांना फायदेशीर ठरणार आहे. तापोळा महाबळेश्वर रस्त्यावरील वाघेरा गावाजवळ दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली होती. प्रशासन ही रस्तावरील दरड हटविली असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
पाटण, महाबळेश्वर, वाई, जावली व सातारा तालुक्यातील ४१ धोकादायक गावांमध्ये व इतर संवेदनशील धोकादायक गावांची समक्ष स्थळ पाहणी करून या गावांमध्ये असणाऱ्या धोकादायक कुटुंबांची तात्पुरत्या स्वरूपाच्या निवाऱ्याची व्यवस्था करणे आणि भोजन व शुद्ध पेयजलासह निवाऱ्याची व्यवस्था करणे, संबंधित प्रशासकीय विभागाच्या मदतीने तत्काळ कार्यवाही करून घेणे इत्यादी आनुषंगिक कामकाज पार पाडण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील धरणांमधील उपयुक्त
पाणीसाठा टीएमसी, कंसात टक्केवारी
कोयना ः ३५.६२ (३५.३८ ), धोम ः ४.५७ (३९.०९), धोम-बलकवडी ः ३.०७ (७७.५३), कण्हेर ः ३.२९ (३४.३१), उरमोडी ः ४.०४ (४१.८७), तारळी ः ४.०२ (३८.७७).
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.