Sangli Rain News : सांगली जिल्ह्यात हलक्या पावसाच्या सरी

Sangli Latest Rain Update : जिल्ह्यातील सर्व भागात कधी उन्हे, तर कधी हलका पाऊस पडत आहे. चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर काही प्रमाणात वाढला आहे.
Rain
RainAgrowon

Sangli Monsoon News : जिल्ह्यातील सर्व भागात कधी उन्हे, तर कधी हलका पाऊस पडत आहे. चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर काही प्रमाणात वाढला आहे. परंतु कमी अधिक पावसाने धरणात पाण्याची आवक कमी आहे.

मुसळधार पाऊस नसल्याने शेतकऱ्यांवरील संकट गडद होत असल्याचे चित्र आहे. शिराळा तालुक्यात चोवीस तासांत ७२ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली. परंतु पावसाचा जोर नाही. कमी अधिक पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना किंचित दिलासा मिळाला असला तरी, जोरदार पाऊस नसल्याने संकट वाढले आहे. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कधी ऊन, तर कधी ढगाळ वातावरण आहे.

Rain
Rain Forecast : कोकणात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता

अधूनमधून हलका पाऊस पडत आहे. शिराळा तालुक्यासह वारणा धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी आहे. वारणा पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी असल्याने धरणात पाण्याची आवकही फारशी होत नाही. सध्या वारणा धरणात १२.६७ टीएमसी इतका पाणीसाठा असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.

Rain
Maharashtra Rain Update : घाटमाथ्यावर दमदार पाऊस

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाचा जोर नसल्याने खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसह ऊस लागवड करण्यासाठी शेतकरी पुढाकार घेत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा करत आहे.

जिल्ह्यात चोवीस तासांत २१.७ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

तालुकानिहाय पाऊस ः मिरज-१६.४, जत-१०.५, खानापूर-विटा-११.६, वाळवा-इस्लामपूर-२५.९, तासगाव-१४.६, शिराळा- ७२, आटपाडी-२२, कवठेमहांकाळ-८.४ पलूस-२४, कडेगाव- १६.४

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com