Radhakrushn Vikhe Patil : ‘मविआ’चे नेते मानसिक संतुलन ढळल्यासारखे बोलतात

राज्यात आमचे सरकार आल्यापासून दुर्दैवाने मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे नेते मनात येईल तसे बरळत आहेत. या विकास आघाडीमधील अनेक नेते मानसिक संतुलन ढळल्यासारखे बोलत आहेत.
Radhakrushna Vikhe Patil
Radhakrushna Vikhe PatilAgrowon

नगर : राज्यात आमचे सरकार आल्यापासून दुर्दैवाने मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे नेते (Mahavikas Aghadi Leader) मनात येईल तसे बरळत आहेत. या विकास आघाडीमधील अनेक नेते मानसिक संतुलन ढळल्यासारखे बोलत आहेत. सत्ता गेल्यानंतर किती वयफल्यग्रस्त असावे हा मुद्दा आहे.

आमचे सरकार भक्कम आहे, पुढील २५ वर्षे आम्ही सत्तेतून जाणार नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी इतर ठिकाणी वेळ खर्च घालण्यापेक्षा खरेतर आता सामाजिक काम हाती घ्यावे. राज्यात अनेक कामे करण्यासारखी आहेत, असा टोला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil) यांनी लगावला.

Radhakrushna Vikhe Patil
Agriculture Education : ग्राममंगल मुक्तशाळेतून मिळतेय कृषीचे शिक्षण

राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठात बोलताना, राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, महा विकास आघाडीचे नेते जे बोलतात ते एकून जनता त्यांना पाठीमागे हसते. महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून जी शिवसेना-भाजपची नैसर्गिक युती होती तीच युती आता सत्तेत आहे.

ही जनतेच्या मनातील युती आहे. आमचे सरकार आल्यापासून राज्यात सरकार पडेल, असे सांगणाऱ्या भविष्यकारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यांची सगळी पोपटपंची सुरू आहे. मंथन शिबिर झाल्यावर सरकार पडेल, असे जर कोणी म्हणत असेल तर त्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही.

Radhakrushna Vikhe Patil
RadhaKrushna Vikhe Patil : वाळूबाबत लवकरच नवे धोरण राबवणार

महाराष्ट्रातून जे मोठे प्रकल्प इतर राज्यात गेले याकडे महाविकास आघाडीने लक्ष दिले नाही. हे प्रकल्प जाणे म्हणजे महाविकास आघाडीचेच पाप आहे. यातून आमच्या सरकारला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. श्वेतपत्रिका निघाल्यानंतर त्यात सगळे स्पष्ट होईल. लोकांना वस्तुस्थिती कळणारच आहे. दोन वर्षे त्यांनी अजिबात लक्ष दिले नाही. त्यांना लोकांना भेटायलाच वेळ नव्हता.

कुक्कुटपालक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारने पहिल्यांदाच पुढाकार घेतला आहे. कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी आहेत. कुक्कुट उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत. त्याबाबत समिती नियुक्त केली असून कुक्कुटपालक शेतकऱ्यांना न्याय देण्याची सरकारची भूमिका राहिली आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

जळीतप्रकरणी आरोग्यमंत्र्यांशी बोलणार

नगर येथील जिल्हा रुग्णालयात कोरोना काळात झालेल्या जाळीतप्रकरणी राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, की या घटनेला अनेक दिवस उलटले असले तरी अजूनही त्याबाबत अहवाल सादर नाही. खरेतर ही बाब गंभीर आहे. त्याची जबाबदारी कोणावर तरी निश्चित झाली पाहिजे. त्या अनुषंगाने मी आरोग्यमंत्र्यांशी बोलणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com