Rabies : रेबीज एक प्राणघातक आजार

जगातील सर्वाधिक कुत्रा चावण्याचे प्रमाण भारतात आहे. रेबीज हा एकमेव आजार असा आहे, ज्यात मृत्युदर १०० टक्के आहे, पण जो १०० टक्के टाळताही येतो.
Rabies
RabiesAgrowon

रेबीज हा सरळ मृत्यूशी गाठ असणारा असा प्राणघातक आजार आहे, जो १५० पेक्षा जास्त देश आणि प्रदेशांमध्ये आढळतो. रेबीज या प्राणघातक आजारामुळे दरवर्षी भारतात सुमारे १८,००० ते २०,००० मृत्यू होतात. जगातील सर्वाधिक कुत्रा चावण्याचे प्रमाण भारतात आहे. रेबीज हा एकमेव आजार असा आहे, ज्यात मृत्युदर (Rabies Death Rate) १०० टक्के आहे, पण जो १०० टक्के टाळताही येतो. कुत्रा चावल्यानंतर रेबीजने होणारा मृत्यू टाळण्यासाठी, लसीचा (Rabies Vaccine) प्रभावीपणे वापर करणे गरजेचे आहे.

Rabies
Lumpy Skin : शेतकऱ्यांची दौलत दीड महिन्यापासून बंद दाराआड

रेबीज होण्याची कारणे

रेबीज होण्याच्या कारणांमध्ये फक्त कुत्रा चावल्याने रेबीज होतो असे म्हणणे चुकीचे आहे. रेबीज हा आजार रेबीज विषाणूग्रस्त कुत्रा, मांजर, माकड, लांडगा, कोल्हा, वटवाघूळ, मुंगूस व इतर काही प्राण्यांनी चावा घेतल्यास त्याच्या लाळेमध्ये असलेले विषाणू जखमेतून माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. रुग्णाची लक्षणे चावा घेतलेली जागा व मेंदूपासून किती अंतरावर आहे यावर अवलंबून असते.

Rabies
Lumpy Skin : पंढरपूर तालुक्यात पशुधनाचे ९२ टक्के लसीकरण

मेंदू व चावा घेतलेल्या जागेमधील अंतर जेवढे कमी तेवढी रोगाची लक्षणे लवकर दिसतात. एका ठिकाणी चावा घेतल्यापेक्षा दोन-तीन ठिकाणी चावा घेतलेल्या माणसात रोगाची लक्षणे लवकर व अधिक तीव्रतेने दिसू शकतात. चावल्यानंतर साधारणपणे २० ते ३० दिवसांत रोगाची लक्षणे दिसतात. परंतु काही वेळा यापेक्षाही अधिक काळ म्हणजे काही महिने ते वर्षे लागतात.

Rabies
Lumpy Skin : लम्पी स्कीनग्रस्त जनावरांना ‘माणुसकी’चा हात

रेबीजच्या एकूण रुग्णांपैकी ९५ टक्के नागरिकांना हा आजार रेबीज विषाणूग्रस्त कुत्र्याने चावा घेतल्यामुळे होतो असे दिसून आले आहे. काही वेळा फक्त लाळेचा संपर्क उघड्या जखमेवर किंवा तोंड, डोळे यांसारख्या ठिकाणी होतो आणि त्यानंतर रेबीजचा विषाणू शरीरात जातो तेव्हा रेबीज पसरू शकतो. एखाद्या संक्रमित प्राण्याने त्वचा चाटली तरीही रेबीज होऊ शकतो. परंतु प्राण्यांच्या चाटण्याने रेबीज संसर्ग झाल्याचे क्वचित आढळून येते. असे असले तरी याकडे दुर्लक्ष करून चालत नाही.

रेबीजची लक्षणे

रेबीजची लक्षणे दिसण्याचा कालावधी सामान्यतः दोन-तीन महिने असतो. काही वेळा हा कालावधी एक आठवड्यापासून एक वर्षापर्यंत बदलू शकतो. हा कालावधी विषाणू प्रवेशाचे स्थान आणि त्याचे प्रमाण यासारख्या घटकांवर अवलंबून असतो. रेबीजच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये वेदनांसह ताप आणि जखमेच्या ठिकाणी असामान्य किंवा अस्पष्ट मुंग्या येणे, टोचणे किंवा जळजळ होणे यांचा समावेश होतो. तीव्र स्वरूपाची डोकेदुखी, ओकारी आल्यासारखी वाटते, नाका-डोळ्यातून पाणी वाहते यांसारखी लक्षणे दिसून येतात.

रेबीजचे दोन प्रकार

फ्युरिअस प्रकार ः उग्र रेबीज

या प्रकारच्या संक्रमणामुळे अस्वस्थपणा, रागीट होणे, अतिक्रियाशीलता, उत्तेजित वर्तन, हायड्रोफोबिया (पाण्याची भीती) आणि काही वेळा एरोफोबिया (ताज्या हवेची भीती), प्रकाशाची भीती वाटणे अशी चिन्हे दिसून येतात. हृदय आणि श्‍वसन क्रिया बंद पडण्याने (कार्डिओ-रेस्पीरेटरी अरेस्टमुळे) काही दिवसांनी मृत्यू होतो.

पॅरालायटिक प्रकार - अर्धांगवायूचा रेबीज

या प्रकारच्या संक्रमणामुळे एकूण माणसांमधील २० टक्के आहे. रेबीजचा हा प्रकार तीव्र स्वरूपाच्या तुलनेत कमी लक्षणे आणि सामान्यतः लांब असतो.चाव्याच्या जागेपासून स्नायू हळूहळू काम करणे कमी करतात. यामुळे कोमा विकसित होतो आणि शेवटी मृत्यू होतो. रेबीजचे अर्धांगवायू स्वरूपाचे अनेकदा चुकीचे निदान केले जाते. या प्रकारच्या रेबीजमध्ये मृत्यू होण्यास काही महिने ते वर्ष देखील लागू शकते.

रेबीजमध्ये घ्यावयाची काळजी

कुत्रे चावल्यानंतर नेमके काय करावे, हे अनेकांना माहीत नाही. जखमेची काळजी कशी घ्यावी, याबद्दल बरेच अज्ञान आहे. कुत्रा चावल्यामुळे झालेली जखम स्वच्छ वाहत्या पाण्याने आणि साबणाने धुणे आवश्यक आहे. कारण रेबीज आजाराचे विषाणू हे कुत्र्याचे लाळेत असतात. किमान १० ते १५ मिनिटे वाहत्या पाण्याने जखम धुतल्यामुळे हे विषाणू जखमेतून धुऊन काढण्यास मदत होते. जखम हाताळताना वेळोवेळी हात स्वच्छ धुवावेत, जखमेतून रक्त जास्त वाहत असल्यास त्यावर पट्टी बांधणे गरजेचे आहे. यानंतर त्वरित जवळच्या डॉक्टरांचा भेटावे.

रेबीजवरील उपचार

रेबीजचे संक्रमण झाल्यानंतर रेबीज इम्युनोग्लोब्युलीन व रेबीज लसीची इंजेक्‍शन आवश्‍यक आहे. प्राण्याने चावलेल्या दिवशी पहिले इंजेक्शन दिले जाते. त्यानंतर ३, ७, १४ आणि काही वेळा २८ व्या दिवशी इंजेक्‍शन दिले जाते. या लसीकरणामुळे शरीराची रोगप्रतिशक्ती वाढते. शरीरामधील विषाणू कमी होण्यास मदत होते. योग्य उपचार झाल्यास आजार नियंत्रणात ठेवून जीव वाचवता येतो.

रेबीज संक्रमित प्राण्याने चावा घेतल्यानंतर झालेल्या जखमेवर मिरची पूड, चुना, मीठ असे लावू नये. जखम फार घट्ट बांधू नये. यासोबत प्राणी चावा घेऊ नये म्हणून भटक्या प्राण्यांवर लक्ष ठेवा, वन्य प्राण्यांच्या जवळ जाऊ नका, वटवाघळांना दूर ठेवा. लहान मुलांमध्ये विशेष लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com