Pune APMC : शेतीमाल आवकेच्या ऑनलाइन नोंदीला हरताळ

पुणे बाजार समितीमधील शेतीमालाची होणारी आवक कमी दाखवून सेस चोरीचे रॅकेट सक्रिय आहे. या चोरीला आळा घालण्यासाठी शेतीमालाची प्रवेशद्वारावर होणारी आवक ते विक्रीवर पाळत ठेवण्यासाठी सात वर्षांपूर्वी सुरू केलेल्या संगणकप्रणालीला हरताळ फासला गेला आहे.
Pune APMC
Pune APMCAgrowon
Published on
Updated on

पुणे ः पुणे बाजार समितीमधील (Pune APMC) शेतीमालाची होणारी आवक (Agriculture Produce Arrival) कमी दाखवून सेस चोरीचे रॅकेट सक्रिय आहे. या चोरीला आळा घालण्यासाठी शेतीमालाची प्रवेशद्वारावर होणारी आवक ते विक्रीवर पाळत ठेवण्यासाठी सात वर्षांपूर्वी सुरू केलेल्या संगणकप्रणालीला हरताळ फासला गेला आहे.

Pune APMC
Pune APMC ; डमी अडत्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक

संगणकप्रणाली प्रभावीपणे राबविली जाऊ नये, यासाठी सक्रिय बाजार समितीमधील झारीतील शुक्राचार्यांमुळे कोट्यवधींच्या नुकसानीला सामारे जावे लागत आहे. समितीने २०१७ पासून ते २०२२ या पाच वर्षांत कंत्राटदारावर साडेचार कोटी रुपयांची खैरात केली आहे.

बाजार समितीच्या शेतमाल आवक आणि विक्रीवरील सेसवर बाजार समितीचे उत्पन्न अवलंबून असते. मात्र बाजार समितीमधील अधिकारी, कर्मचारी आणि अडत्यांच्या अभद्र युतीतून शेतीमालाची कमी आवक नोंद करण्याचा गैरप्रकार गेली अनेक वर्षे बाजार समितीमध्ये सुरू आहे.

Pune APMC
Pune APMC : बनावट व्यापाऱ्यांकडून थकीत पैसे देणे सुरू

हा गैरप्रकार रोखण्यासाठी २०१७ मध्ये स्टर्लिंग सिस्टिम्स प्रा. लि. या कंपनीला संगणकीकरण आणि ऑनलाइन आवक नोंदीसाठी ५९ महिन्यांमध्ये सुमारे चार कोटी ५० लाख रुपये अदा करण्यात आल्याचे समोर आले आहे.

संगणकीकरणाद्वारे प्रत्येक गाळ्यावर होणाऱ्या शेतीमालाची आवक नोंद प्रवेशद्वारावरच करून त्याचा मोबाईल संदेश संबंधित शेतकरी आणि अडत्याला पाठविण्याची यंत्रणा आहे. पहिले काही दिवस प्रायोगिक तत्त्वावर हे काम करण्यात आले. नंतर विविध टप्प्यांवर आवक नोंद आणि शेतीमालावरील पाळत ठेवली गेली. मात्र सध्या हे काम संथ गतीने सुरू आहे. चार कोटी रुपये खर्चून देखील हे काम १०० टक्के पूर्ण झाले नसल्याची स्थिती आहे.

हिशेब पट्‍ट्यांशिवाय व्यवहारांना अधिकाऱ्यांचे आशीर्वाद

हिशेब पट्टयांशिवाय केवळ चिठ्ठीवर शेतीमाल विक्रीचे व्यवहार होत असल्याच्या तक्रारी काही शेतकऱ्यांनी केल्या होत्या. हा गैरप्रकार उघड झाल्यावर संगणकीय नोंदीला हरताळ फासला जात असल्याचे समोर आले आहे. या कामात कोणते अधिकारी आणि कर्मचारी सहभागी आहेत, याचा शोध घेणे प्रशासकांसाठी जिकिरीचे झाले आहे.

‘‘बाजार समितीमधील शेतीमाल आवक आणि विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्याद्वारे जास्तीत जास्त सेस मिळविण्यासाठी करत असलेल्या विविध उपाययोजनांमधील संगणकीय आवक नोंद ही एक यंत्रणा आम्ही राबवीत आहोत. ही यंत्रणा १०० टक्के अचूक असेल, असा आमचा दावा नाही,’’ अशी माहिती पुणे बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली.

सध्या प्रत्येक शेतमालाची आवक नोंद प्रवेशद्वारावर होऊन, संबंधित अडत्या, वाहनचालक आणि शेतकऱ्याला संदेश पाठविला जात आहे. मात्र काही टेम्पो शेतीमालाची नोंद एका गाळ्यावर आणि विक्री दुसऱ्या गाळ्यावर होते. असे प्रकार होत असतील, तर त्याच्या तक्रारी प्राप्त होतात. या तक्रारींचा निपटारा आम्ही करतो.
मधुकांत गरड, प्रशासक, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com