Pulses Sowing : कोवाड भागांत कडधान्य क्षेत्र वाढण्याची शक्यता

या वर्षी अतिवृष्टीने शेत शिवारातील जलस्रोत वाढले आहे. त्याचा फायदा रब्बीला होईल. कडधान्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.
Rabi Season
Rabi SeasonAgrowon

कोवाड, जि. कोल्हापूर : रब्बी हंगामाला (Rabi Season) वेगवान सुरुवात झाली आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांनी मसूर, वाटाणे, हरभरा, मोहरी या कडधान्यांच्या पेरणीला (Pulses Sowing) सुरुवात केली आहे. या वर्षी अतिवृष्टीने (Rain) शेत शिवारातील जलस्रोत वाढले आहे. त्याचा फायदा रब्बीला होईल. कडधान्याचे क्षेत्र (Pulses Acreage) वाढण्याची शक्यता आहे.

चंदगड तालुक्यातील माणगावपासून राजगोळीपर्यंतच्या पूर्व भागातील कुदनूर, कालकुंद्री, कागणी, कोवाड, किणी, नागरदळे, कडलगे, सुंडी, करेकुंडी, होसूर, कल्याणपूर, बुक्किहाळ, म्हाळेवाडी, घुल्लेवाडी, मांडेदुर्ग, कार्वे, ढोलगरवाडी, जक्कनहट्टी आदी गावांतून कडधान्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

मसूर, वाटाणे, हरभरा, मोहरी ही पारंपरिक बियाणे शेतकऱ्यांनी जतन करून ठेवली आहेत. दरवर्षी भाताची कापणी झाल्यानंतर तेथे ही कडधान्ये पेरली जातात. जुनी व पारंपरिक बियाणे असल्याने या भागातील कडधान्यांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे.

Rabi Season
Pulses Cultivation : माणगावमध्ये कडधान्याच्या शेतीला बहर

अलीकडे ऊस पिकाचे क्षेत्र वाढल्याने कडधान्य पिकाचे क्षेत्र कमी झाले आहे. या वर्षी सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस जोरदार झाला. यामध्ये भात, सोयाबीन, सूर्यफूल, ऊस पिकाचे नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला.

मात्र याच परतीच्या पावसामुळे शेतशिवारातील भूजल पातळी वाढली आहे. त्याचा फायदा आता रब्बी पिकाला होणार असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. सध्या कडधान्याच्या पेरणीला पोषक वातावरण आहे. त्यामुळे भात पिकाची मळणी झाल्यानंतर लागलीच कडधान्य पिकाच्या पेरणीचे काम करत आहेत.

Rabi Season
Crop Damage Compensation : तुटपुंजी पीक नुकसानभरपाई परत केली विमा कंपनीला

जमिनीत ओलावा असल्याने रब्बी पिकांच्या उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज कृषी खात्याने वर्तवला आहे. खरिपातील नुकसानीची उणीव भरून काढण्यासाठी अनेक गावांतून शेतकरी पिकांच्या पेरणीच्या कामात गुंतला आहे. कृषी विभाग शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com