किसान सभा, आरोग्य उपकेंद्राच्या माध्यमातून देणार गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा

आंबेगाव तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षम व्हावी व गोरगरिबांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी यासाठी किसान सभेच्या वतीने सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
Heath Care
Heath CareAgrowon
Published on
Updated on

पुणे : आंबेगाव तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षम व्हावी व गोरगरिबांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी यासाठी किसान सभेच्या वतीने सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था व किसान सभा यांनी वेळोवेळी संवादातून आरोग्यविषयक समस्या सोडवल्या आहेत. यापुढे ही आरोग्य व्यवस्थेतील समस्यांवर लोकसहभागातून मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी किसान सभेला दिले.

आंबेगाव तालुक्यातील डिंभे, तळेघर व अडविरे या तीन प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणारी उपकेंद्राच्या प्रश्नाबाबत समुदाय वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका यांची व किसान सभा, आंबेगाव तालुका समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ यांची एकत्रित समन्वय बैठक रविवारी (ता.१९) पंचायत समिती आंबेगाव येथे पार पडली. या बैठकीसाठी किसान सभेचे आंबेगाव तालुका उपाध्यक्ष राजू घोडे, किसान सभा आंबेगाव तालुका सचिव अशोक पेकारी, बाळू काठे, रेश्मा गिरंगे, शंकर काठे, रामदास लोहकरे, दत्ता गिरंगे, आदिम व साथी संस्थेचे प्रतिनिधी अनिल सुपे व डिंभे, तळेघर, अडविरे या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी इ. उपस्थित होते. या बैठकीत किसान सभेचे आंबेगाव तालुका सचिव अशोक पेकारी यांनी प्रास्तविक व आभार मानले.

प्रत्येक उपकेंद्र निहाय झालेले प्रमुख निर्णय खालीलप्रमाणे :

- प्रत्येक उपकेंद्रात जनआरोग्य समिती पंधरा दिवसांत स्थापन करून त्यांच्या बैठका होतील.

- जनआरोग्य समितीच्या माध्यमातून व स्थानिक ग्रामसभांच्या माध्यमातून उपकेंद्राचे बळकटीकरण व सक्षमीकरण केले जाईल.

- उपकेंद्रात नेमणुकीस असलेले समुदाय वैद्यकीय अधिकारी हे किमान दोन दिवशी रुग्ण तपासणी करून उर्वरित दिवसांत गाव, वाडी, वस्तीवर जाऊन रुग्णसेवा देतील.

- दवाखान्यातील कोणताही कर्मचारी सुट्टीवर असेल, गावभेटीवर असेल किंवा त्यांची ड्युटी प्राथमिक आरोग्य केंद्रावर असेल तर तसे सूचना फलक लावण्यात येईल.

- उपकेंद्र बंद राहणार नाही. याची काळजी घेतली जाईल.

- अनेक वेळा, समुदाय वैद्यकीय अधिकारी हे प्राथमिक आरोग्य केंद्रावर थांबतात व यामुळे ते आरोग्यवर्धिनी केंद्रात नसायचे. पण यापुढे हे समुदाय वैद्यकीय अधिकारी, उपकेंद्रात आरोग्य सेवा देतील.

- ज्या ठिकाणी गावभेट करण्यासाठी जाण्या-येण्याची अडचण असेल तिथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे, वैद्यकीय अधिकारी, रुग्णवाहिकेची महिन्यातून किमान दोनदा व्यवस्था करतील.

- उपकेंद्राचे कर्मचारी यांनी उपकेंद्र येथेच राहावे यासाठी या इमारती दुरुस्त करण्याबाबत पत्रव्यवहार केला जाईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com