
Chhatrapati Sambhajinagar News : पावसाअभावी यंदाच्या खरिपावर भीषण संकट आहे. दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत खरिपाच्या नुकसान भरपाईसाठी व रब्बी हंगामासाठी तातडीने शेतकऱ्यांना एकरी १० हजार रुपये सहायता निधी द्यावा, अशी मागणी भारतीय किसान संघाने केली आहे.
या संदर्भात भारतीय किसान संघाचे तालुकाध्यक्ष कृष्णा दांडगे, तालुका मंत्री शिवाजीराव नवपुते, जिल्हा मंत्री हरिभाऊ दांडगे, जिल्हा उपाध्यक्ष माधवराव दांडगे यांच्यासह भुजंगराव दांडगे, भास्कर देशमुख, बबनराव फोके आदींनी छत्रपती संभाजीनगरच्या तहसीलदारांना निवेदन दिले. त्यानुसार, सहायता निधी देण्यासह सहा मागण्या करण्यात आल्या आहेत. भारतीय किसान संघाच्या राज्य शाखेने यासंदर्भात थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे.
...या आहेत मागण्या
खरीप हंगामाच्या नुकसान भरपाईसाठी व रब्बी हंगामासाठी तातडीने एकरी दहा हजार रुपये शेतकरी सहायता निधी द्यावा. चारा व पाणी टंचाईला तोंड देत पशुधन सांभाळण्यासाठी प्रतिपशुधन १ हजार रुपयांची तातडीची मदत द्या.
पावसाचे पाणी विविध जलसंधारण पद्धतीचा उपयोग करून साठवण्यासाठी प्रोत्साहन व जनजागृती कार्यक्रम योजना जाहीर करा. पुढील बारा महिन्यांसाठी रोजगार निर्मितीसाठी उपाययोजना करा अत्यल्प दरात पशुधन विकावे लागू नये यासाठी उपाय योजावेत कमी पाण्यामध्ये तग धरू शकणाऱ्या चारा पिकांचे बियाणे द्या
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.