Drought Condition : राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा ; केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांची राज्य शासनाकडे मागणी

Lack of Rainfall : राज्यासह नाशिक जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती ओढवली असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना निवेदन देऊन राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली.
Bharati pawar
Bharati pawarAgrowon

Nashik News : राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने महिनाभर दडी मारली असल्याने संभाव्य दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी पाणीसंकट निर्माण झाले आहे. राज्यासह नाशिक जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती ओढवली असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना निवेदन देऊन राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली.

Bharati pawar
Onion subsidy : ‘एनसीसीएफ’कडे विक्री केलेल्या कांद्याला ३५० रुपये अनुदान द्या’ ; भारती पवार यांचे मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्याने राज्यात अनेक जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाले असून धरणांमध्ये आवश्यक प्रमाणात पाणीसाठा नाही. अधिक पर्जन्यमान असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील  पश्चिम पट्ट्यात पावसाने पाठ फिरवली असल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. जिल्ह्यातील गोदावरी खोऱ्यातील समुहातील एकही धरण पूर्ण क्षमतेने भरले नसल्याने पिण्याच्या पाण्याचा तसेच सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणे कठीण होणार असल्याचेही डॉ. पवार यांनी म्हटले आहे.

Bharati pawar
Onion Procurement : कांद्याची खरेदी भाव पाडण्यासाठी नव्हे तर..; नाफेडच्या खरेदीवर केंद्रीय मंत्री भारती पवार यांचे स्पष्टीकरण

यावर्षी खरीप पेरणीसाठी आवश्यक प्रमाणात पाऊस झाला नसल्याने अत्यल्प पावसावर जुलै महिन्यात शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करून पेरण्या केल्या आहेत. मात्र पेरण्या झाल्यानंतर पुन्हा पावसाचा खंड पडल्यामुळे पिके करपली असून दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडला आहे, असे निवेदनात नमूद केले आहे.

‘भरघोस मदत जाहीर करावी’

जिल्ह्यातील ५४ मंडलांतील अनेक गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात असून पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशा चिंताजनक परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरघोस मदत जाहीर करावी. तसेच शासनाच्या आवाहलानुसार शेतकऱ्यांनी खरीप पिकांचा विमा काढलेला आहे. राज्यात दुष्काळी परिस्थिती उद्‌भवू नये म्हणून सरकार प्रयत्नशील आहे, तरीदेखील परिस्थितीचे गांभीर्य विचारात घेता  शासनाने  विमा कंपन्या, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी  मदत व भरपाई देण्याबाबत निर्देश देण्याची मागणी डॉ. पवार यांनी केल्याचे त्यांनी कळविले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com