Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांसह आंदोलकांना न्यायालयातून जामीन मंजूर

तुपकरांसह २५ जण अकोला कारागृहात असून, बुधवारी (ता. १५) येथील न्यायालयाने या आंदोलकांना जामीन मंजूर केला आहे. वेळेत सुटकेचा आदेश अकोला कारागृहात पोहोचला, तर सर्वांची बुधवारीच सुटका होऊ शकणार आहे.
Ravikant Tupkar
Ravikant TupkarAgrowon
Published on
Updated on


ॲग्रोवन वृत्तसेवा
बुलडाणा ः येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी (ता. ११) कापूस-सोयाबीन दरवाढ, पीकविमा व इतर मागण्यांसाठी आत्मदहन आंदोलन करण्याचा प्रयत्न करणारे रविकांत तुपकर (Ravikant Tupkar ) व इतर शेतकऱ्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल करीत अटक केली होती.

तुपकरांसह २५ जण अकोला कारागृहात असून, बुधवारी (ता. १५) येथील न्यायालयाने या आंदोलकांना जामीन मंजूर केला आहे. वेळेत सुटकेचा आदेश अकोला कारागृहात पोहोचला, तर सर्वांची बुधवारीच सुटका होऊ शकणार आहे.

शेतकऱ्यांना पीकविम्याची संपूर्ण रक्कम मिळावी, अतिवृष्टीच्या नुकसानाची भरपाई केली जावी, तसेच सोयाबीन-कापूस दरवाढीच्या मुद्यावर केंद्र-राज्याने तातडीने पाऊले उचलावीत, अशा मागण्यांसाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तुपकरांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.

पोलिसांच्या वेषात येत तुपकर यांनी अंगावर डिझेल ओतून घेतले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. मात्र या वेळी मोठा गोंधळ उडाला.

पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला. तुपकरांसह २५ जणांविरुद्ध विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल केले. या सर्वांना न्यायालयासमोर हजर केले असता १४ दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.

दरम्यान, कारागृहात देखील तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू ठेवल्याने त्यांची प्रकृती ढासळली.

Ravikant Tupkar
Ravikant Tupkar : रविकांत तुपकर यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

या प्रकरणी बुधवारी (ता. १४) बुलडाणा न्यायालयाने रविकांत तुपकर यांच्यासह सर्व सहकाऱ्यांचा जामीन मंजूर केला आहे, अशी माहिती तुपकर यांच्या पत्नी अॅड. शर्वरी तुपकर यांनी दिली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश साने यांच्या न्यायालयात यावर मंगळवारी (ता. १४) सुनावणी झाली होती.

न्यायालयाने बुधवारी या बाबत निकाल दिला. पंधरा हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. या बाबतची कागदपत्रे दुपारी चार वाजेपर्यंत अकोला कारागृहात पोहोचली, तर सर्वांची याचदिवशी सुटका होऊ शकते. कागदपत्रे पोहोचण्यास उशीर झाल्यास गुरुवारी (ता. १६) सुटका होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com