Flower Farming : मुदखेडला फूल उत्पादक शेतकऱ्‍यांचे आंदोलन

मुदखेड तालुक्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या फुलांना नांदेड येथील व्यापारी योग्य दर देत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी फूलतोडणी बंद करून आंदोलन सुरू केले आहे.
Flowers Farming
Flowers FarmingAgrowon

नांदेड : मुदखेड तालुक्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या (Flower Farmer) फुलांना नांदेड येथील व्यापारी योग्य दर (Flower Rate) देत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी फूलतोडणी (Flower Harvesting) बंद करून आंदोलन सुरू केले आहे.

मुदखेड तालुक्यासह नांदेड शहराजवळील अर्धापूर, भोकर, उमरी, नांदेड या तालुक्यांतील शेतकरी मोठ्या प्रमाणात फूल उत्पादन घेतात.

Flowers Farming
Nishigandha Flower : शेतकरी का देत आहेत निशिगंधाला पसंती ?

ही फुले हैदराबाद, मुंबई, विजयवाडा, करनूल, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, सिंदीपेठ या ठिकाणी पाठविली जातात. परंतु नांदेड येथील फूल व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.

फुलांना कमी भाव देऊन आर्थिक कोंडी करत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी मुदखेड तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीकडे केली आहे.

Flowers Farming
Flower Crop : फ्लावरचे अंतर पीक जोमात

या बैठकीत फूल उत्पादक शेतकरी संघटनेचे महेश काळे, श्रीनिवास पारवेकर, अविनाश पोतेवार, विठ्ठल आचार्य, महादेव पाटील वसुरे, आनंदा धडे, सतीश मोरे, दिनेश मोरे, संदीप मोडवान, गजानन ढगे, आनंदा जवंजाळ, संभाजी ढगे, शंकर पेरके, इशरत शेख, उत्तम पाटील, गंगाधर दासरे, रत्नाकर तारु, गोविंद जोंधळे, सोनू चंद्रे, संभाजी लोकरे आदी शेतकरी उपस्थित होते.

लूट थांबवावी

मुदखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी याबाबत बैठक घेतली. यात नांदेड येथील व्यापारी मनमानी करत आहेत. ते फुलांना योग्य भाव देत नाहीत, तोपर्यंत फुले तोडायची नाहीत. तसेच ती मार्केटला नेणार नाही, असा बैठकीत निर्णय घेण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्‍वर चौक, मोंढा चौक येथे मोटरसायकल रॅली काढत फुले फेकून आंदोलन करण्यात आले. फूल उत्पादक शेतकऱ्यांसाठी एमआयडीसीमध्ये जागा द्यावी, फूल व्यापारावर शासनाने नियंत्रण ठेवावे, शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com