Pune APMC
Pune APMC Agrowon

Pune APMC News : बाजार समिती घटकांकडून आज काळे कपडे घालून निषेध

बाजार समिती आवारात कोणताही परवाना न घेता बेकायदेशीररीत्या अतिक्रमण करून, लिंबाची विक्री अनेक महिलांकडून सुरू होती. या लिंबू विक्रीमुळे बाजार आवारात वाहतूक कोंडी होत होती.
Published on

Pune News पुणे (हवेली) कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बेकायदेशीर लिंबू विक्री करणाऱ्या महिलांवर कारवाई केल्याचा राग मनात धरून तत्कालीन प्रशासक, अधिकारी, कर्मचारी व अडत्यांच्या विरोधात दाखल झालेला ॲट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा रद्द व्हावा, यासाठी सोमवारी (ता. १७) बाजार घटकांकडून काळे कपडे घालून निषेध करण्यात येणार आहे. तर गुरुवारी (ता. २०) बाजार बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती आडते असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध भोसले यांनी दिली.

दरम्यान, शनिवारी (ता. २२) अक्षय तृतीया असल्याने आणि आंबा हंगाम जोमात असल्याने बाजार बंद ठेवू नये आणि शेतकऱ्यांना वेठीस धरू नये, अशी भूमिका काही अडत्यांनी व्यक्त केली. मात्र बाजार बंद ठेवण्यावर विविध बाजार संघटना ठाम राहिल्याने बंद ठेवण्यात येणार आहे.

Pune APMC
Pune APMC : पुणे बाजार समितीचे सचिव मधुकांत गरड यांचे निलंबन

PUne APMCबाजार समिती आवारात कोणताही परवाना न घेता बेकायदेशीररीत्या अतिक्रमण करून, लिंबाची विक्री अनेक महिलांकडून सुरू होती. या लिंबू विक्रीमुळे बाजार आवारात वाहतूक कोंडी होत होती. याच्या विरोधात अतिक्रमण निर्मूलन मोहीम बाजार समिती प्रशासनाने पोलिसांच्या सहकार्याने राबविली.

Pune APMC
Pune APMC Election : पुणे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये अनेक इच्छुकांचे अर्ज बाद

मात्र ही मोहीम राबविताना कोणताही गुन्हा अधिकाऱ्यांवर दाखल झाला नाही. मात्र सहा महिन्यांनंतर दाखल झालेला गुन्हा हा अन्यायकारक असल्याची भूमिका बाजार समिती अधिकारी, कर्मचारी, बाजार घटकांनी मांडत. दाखल झालेले गुन्हे रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे केली आहे.

या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (ता. १७) काळे कपडे घालून निषेध करण्यात येणार आहे. तर गुरुवारी (ता. २०) बाजार बंद ठेवण्यात येणार असल्याचे अडते असोसिएशनच्या रविवारी (ता. १६) झालेल्या बैठकीत ठरल्याचे अडते असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध भोसले यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com