Pune APMC : पुणे बाजार समितीचे सचिव मधुकांत गरड यांचे निलंबन

बाजार समितीमधील मोक्याच्या भूखंडातील काही जागा डाळिंब यार्डच्या नावाखाली निविदा प्रक्रिया किंवा जाहीर सूचनेद्वारे न करता विशिष्ट आडत्यांना देण्याचा घाट घातला जात होता.
Pune APMC
Pune APMC Agrowon

Pune APMC News पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील विशिष्ट आडत्यांना डाळिंब यार्डच्या (Pomegranate Yard) नावाखालील भूखंड वाटप (APMC Land), अनधिकृत शेड उभारणी, विविध बंद पाकिटातील निविदा आदी प्रकारांतील गैरव्यवहाराच्या चौकशी प्रकरणी बाजार समितीचे सचिव मधुकांत गरड (Madhukant Garad) यांचे निलंबन करण्यात आले आहे.

दरम्यान, बाजार समिती प्रशासकपदाचा अतिरिक्त कार्यभार विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था) संजय भोसले यांच्याकडे, तर सचिवपदी सध्याचे प्रशासक डी. एस. हौसारे यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. निलंबनाचा आदेश शनिवारी (ता.२५) रात्री सहकार व पणन विभागाचे कक्ष अधिकारी अनिल चौधरी यांच्या आदेशाने उशिरा निघाला.

Pune APMC
Pune APMC : पुणे बाजार समितीमधील भुसार व्यापाऱ्यांना जप्तीच्या नोटिसा

बाजार समितीमधील मोक्याच्या भूखंडातील काही जागा डाळिंब यार्डच्या नावाखाली निविदा प्रक्रिया किंवा जाहीर सूचनेद्वारे न करता विशिष्ट आडत्यांना देण्याचा घाट घातला जात होता. हे प्रकरण माध्यमांनी बाहेर काढल्यानंतर याची चौकशी करण्याचे आदेश पणन संचालकांनी दिले होते.

तसेच बाजार आवारातील बेकायदा शेड उभारणीच्या देखील चौकशीचे आदेश दिले होते. या दोन्ही चौकशी अहवालांमध्ये नियमबाह्य काम झाल्याचे निदर्शनास आल्याची चर्चा बाजार आवारात आहे.

Pune APMC
Pune APMC : पुणे बाजार समितीमध्ये बेकायदा शेड उभारणी

दरम्यान, गरड यांची बदली पणन संचालनालयात उपसंचालक म्हणून करण्यात आली होती. या बदलीला गरड यांनी ‘मॅट’मध्ये दाद मागत सरकारला आव्हान दिले होते. ‘मॅट’ने बदलीला स्थगिती देत पुन्हा पदस्थापना केली होती.

मात्र सरकारने गरड यांच्याकडील प्रशासकपदाचा पदभार काढत त्यांची सचिव पदी नियुक्ती केली. तर प्रशासकपदी डी. एस. हौसारे यांची नियुक्ती केली होती. मात्र शनिवार (ता.२५) आदेशाने गरड यांचे निलंबन करण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com