Agriculture Department Action : शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या १४ विक्रेत्यांना दणका, सातारा कृषी विभागाकडून परवाने निलंबित

License Suspends : बोगस बियाणे आणि खतांची विक्री करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रावर छापा टाकून १४ कृषी विभागाने दणका दिला.
Agriculture Department Action
Agriculture Department Actionagrowon
Published on
Updated on

Satara Agriculture Department: खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कृषी सेवा केंद्र चालकांना कृषी विभागाने चांगलाच दणका दिला आहे.  गेल्या काही दिवसांमध्ये एकूण १४ कृषी साहित्य विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे कृषी सेवा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तर पुढेही अशीच कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती सातारा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Agriculture Department Action
Fake Seeds : बोगस बियाणे कारखान्यावर छापा; वर्धा आणि नांदेडमध्ये अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त

खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते, बियाणे चढ्या दराने विक्री करणे, बोगस खते शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न काही कृषी सेवा विक्रेत्यांकडून केला जातो. त्यामुळे खरीप हंगाम २०२२-२३ मध्ये खते, बियाणे विक्रीत बोगसपणा करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईसाठी जिल्हा व विभागीय स्तरावर भरारी पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत. या पथकाने शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांची लुटमार करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली आहे.

Agriculture Department Action
Bogus Seed : बोगस बियाणेप्रकरणी तपासासाठी आता ‘एसआयटी’

सातारा जिल्ह्यांतील पथकांनी गेल्या महिन्याभरात ३ बियाणे विक्रेते, ९ खत विक्रेत्यांसह २ कीटकनाशके विक्रेत्यांवर कारवाई करत, त्यांचा परवाना निलंबित केला आहे. जिल्ह्यात पथकाने २ खत व १ किटकनाशक विक्रेत्याचा परवाना रद्द केला आहे.

जिल्हयात 12 भरारी पथकांमार्फत कृषि सेवा केंद्रांची तपासणी सुरू आहे. कृषि निविष्ठांची जादा दराने विक्री, अप्रमाणित कृषि निविष्ठांची विक्री करणे इत्यादी प्रकार आढळून आल्यास संबंधित कृषि सेवा केंद्रावर कठोर कायदेशिर कारवाई करणेत येईल, असा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला आहे.

जिल्हयामध्ये खरीप हंगाम २०२३ च्या अनुषंगाने रासानिक खतांची उपलब्धता पुरेशा प्रमाणात आहे. त्यामध्ये युरिया – १६ हजार ७६४ मे.  टन , डी. ए. पी. १० हजार २८७ मे. टन, म्युरेट ऑफ पोटॅश ९२६ मे. टन, सुपर फॉस्फेट ९ हजार ३७५ मे. टन तसेच इतर संयुक्त खते २५ हजार ९२७ मे. टन  या प्रमाणात उपलब्ध आहेत. बियाणांचा पुरवठा ही योग्य प्रमाणात झाला आहे.  यामध्ये ज्वारी -६८५ क्विंटल. बाजरी १ हजार ५९५ क्विंटल, भात १० हजार ७४९ क्विंटल,  सोयाबीन १४ हजार ९६ क्विंटल, घेवडा २ हजार  १७९ क्विंटल, मका ६ हजार ३४७ क्विंटल बियाणे कृषि सेवा केंद्रावर विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

माॅन्सूनचा पाऊस लांबला असून शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा (४ ते ५  इंच खोल) किंवा ७५ ते १००  मि. मी. पाऊस झाल्यावरच पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com