Heavy Rain Compensation : अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीच्या भरपाईसाठी ७४ कोटींचा प्रस्ताव

Kharif Season : यंदा मॉन्सून विलंबाने आल्याने पेरण्या उशिरा झाल्या. जिल्ह्यात ६ लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्रात खरिपाची पेरणी झाली.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Amravati News : ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्याने अमरावती जिल्ह्यात ७२ हजार हेक्टर शेतजमिनीवरील पिके जुलैतील अतिवृष्टीने नष्ट झाली आहेत. ९५ हजार ६७१ शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठीच्या ७४ कोटी ४० लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे.

यंदा मॉन्सून विलंबाने आल्याने पेरण्या उशिरा झाल्या. जिल्ह्यात ६ लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्रात खरिपाची पेरणी झाली. जूनच्या अखेरच्या आठवड्यात गतीने सुरू झालेल्या पेरण्या जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत झाल्यात. यामध्ये कापसाची २,६१,५७९ हेक्टर, सोयाबीन २,५४,६०८, तूर १,०९,८१०, मूग १०६४, उडीद ५७६, ज्वारी ९५३५, तर धानाची ५६७९ हेक्टरमध्ये पेरणी झाली.

Crop Damage
Crop Damage Compensation : अतीवृष्टीच्या मदतीबाबत संभ्रम दूर न केल्यास अंदोलन

मॉन्सूनपूर्व झालेल्या पेरण्या व पहिल्या आठवड्यातील पेरण्यांना जुलैतील पावसाने संजीवनी दिली. मात्र यादरम्यान झालेल्या अतिवृष्टीने त्यावर पाणी फेरले गेले. अमरावती, भातकुली, चांदूररेल्वे, नांदगाव खंडेश्‍वर, मोर्शी, चांदूरबाजार, चिखलदरा व धामणगावरेल्वे तालुक्यातील तब्बल ७२ हजार ७० हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन, तूर, कपाशी, धान यांसह भाजीपाला व फळपिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले आहे.

Crop Damage
Crop Damage Compensation : नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईपासून वंचित

सर्वाधिक नुकसान कोरडवाहू शेतीचे झाले असून ६२ हजार ५३९ हेक्टरला फटका बसला आहे. बागायतीखालील ३६६ व फळपिकाखालील ९१६४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या आठ तालुक्यांतील ९५ हजार ६७१ शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे.

नुकसानीचा संयुक्त अहवाल तयार करून पाठविण्यात आला. यामध्ये ७४ कोटी ४० लाख रुपयांचे अनुदान मागण्यात आले आहे. जिरायती पिकांसाठी ८५०० रुपये, बागायतीसाठी १७ हजार रुपये व फळपिकांसाठी २२,५०० रुपये प्रति हेक्टरप्रमाणे अनुदानाची मागणी नोंदविण्यात आली आहे.

पीकनिहाय नुकसान (हेक्टर)

सोयाबीन (३३,५२१), तूर : १२,४९२, कापूस (१६,५१२), ज्वारी (०.३७), धान (१.५४), भाजीपाला (२३४), कांदा (१८), केळी (८९), संत्रा (९११८), लिंबू (३), मोसंबी (२७), आवळा (१६) अशी मिळणार नुकसानभरपाई (प्रति हेक्टर) जिरायती क्षेत्र : ८५०० रुपये, बागायती क्षेत्र : १७,००० रुपये, बागायती क्षेत्र : २२,५०० रुपये.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com