Sugarcane Farmer Kolhapur : तर ऊस तोडणी मुकादमांच्या मालमत्ता जप्त होणार? कोल्हापूर पोलीस अधिक्षकांच्या सूचना

sugarcane transporter : पश्चिम महाराष्ट्रात मागच्या ५ वर्षांपासून ऊस तोडणी मजूरांकडून ऊस वाहतूकदार आणि साखर कारखानदारांची फसवणूक केल्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
Sugarcane Farmer Kolhapur : तर ऊस तोडणी मुकादमांच्या मालमत्ता जप्त होणार? कोल्हापूर पोलीस अधिक्षकांच्या सूचना
agrowon
Published on
Updated on

Kolhapur Sugarcane News : पश्चिम महाराष्ट्रात मागच्या ५ वर्षांपासून ऊस तोडणी मजूरांकडून ऊस वाहतूकदार आणि साखर कारखानदारांची फसवणूक केल्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे ऊस वाहतूकदार आणि कारखानदारांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. दरम्यान ज्या ऊस तोडणी मुकादमांनी (ठेकेदार) करार करून वाहतूकदार आणि साखर कारखान्यांची फसवणूक केली आहे त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याचे आदेश कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिले आहेत.

पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित म्हणाले की, फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधित ठेकेदारांच्या मालमत्ता जप्तीसाठी पोलिस प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा शोध घेतला जाणार आहे. गेल्या चार महिन्यांपासून जिल्ह्यातील बहुतांश पोलिस ठाण्यांत फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

चार महिन्यात ७९८ गुन्हे दाखल झाले असून, ठेकेदार आणि मजूर अशा १,११० संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. या सर्वांनी सुमारे ६८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. ऊस तोडणी मजुरांशिवाय ऊस वाहतूकदार आणि साखर कारखान्यांचे काम सुरूच होत नाही.

हीच गरज लक्षात घेऊन ऊस तोडणी मजुरांच्या टोळ्या पुरवणाऱ्या ठेकेदारांनी वाहतूकदार आणि साखर कारखान्यांचा गैरफायदा घेतला. मजूर पुरवठ्यासाठी लाखो रुपयांची अनामत रक्कम घेऊन ऐनवेळी मजुरांचा पुरवठा केला नाही. यामुळे जिल्ह्यातील ऊस वाहतूकदार आणि साखर कारखान्यांचे नुकसान झाल्याची माहिती पंडित यांनी दिली.

Sugarcane Farmer Kolhapur : तर ऊस तोडणी मुकादमांच्या मालमत्ता जप्त होणार? कोल्हापूर पोलीस अधिक्षकांच्या सूचना
Raju Shetti : राजू शेट्टींना 'इंडिया' आघाडीच्या बैठकीला आमंत्रण, शेट्टींनी केला खुलासा

दरम्यान याबाबत ऊस वाहतूकदार अभय शिरगुप्पे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मी २०२२ -२३ साली जवाहर सहकारी साखर कारखान्यासोबत ऊस वाहतूकीचा करार केला होता. यासाठी बँकेतून जवळपास ५ ते ७ लाखांचे कर्ज काढून मजुरांना पैसे दिले होते.

परंतु मुकादमाने फसवणूक केल्याने मागच्या वर्षाच्या हंगामात वाहने दारात लागून राहिल्याने आम्हाला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान याप्रकरणी मी हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केल्याची माहिती अभयने दिली.

हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हुपरी परिसरातील ६ ऊस वाहतूकदारांनी आमच्याकडे तक्रार नोंदवली आहे. त्या अनुषंगाने आम्ही वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

टोळी मुकादमांना याप्रकरणी नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. त्यांना दिलेल्या तारखेपर्यंत हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. याचबरोबर पोलीस अधिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही पुढील कारवाई करणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

किशोर शिंदे, पोलीस निरीक्षक हुपरी पोलीस स्टेशन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com