Women Empowerment : महिला बचतगटांची उत्पादने आता देशभर जाणार

केंद्र शासनाच्या ‘वन स्टेशन वन शॉप’ या उपक्रमाअंतर्गत अकोला रेल्वे स्टेशनवर महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी दालन कार्यान्वित झाले आहे. अकोला रेल्वेस्थानकावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांमार्फत महिला बचतगटांची उत्पादने आता देशभर जाणार आहेत.
Women Self- Help Group
Women Self- Help GroupAgrowon
Published on
Updated on

अकोला ः केंद्र शासनाच्या ‘वन स्टेशन वन शॉप’ (One Station One Shop) या उपक्रमाअंतर्गत अकोला रेल्वे स्टेशनवर महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या (Women Self Help Group) विक्रीसाठी दालन कार्यान्वित झाले आहे. अकोला रेल्वेस्थानकावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांमार्फत महिला बचतगटांची उत्पादने (Women Self Help Group Product) आता देशभर जाणार आहेत.

Women Self- Help Group
महिला बचत गटांना ‘नई रोशनी’चा आधार

जिल्हाधिकारी निमा अरोरा व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते या स्टॉलचे उद्घाटन झाले.अकोला रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर हा स्टॉल लावण्यात आला आहे. सूर्योदय महिला बचत गटाला हा स्टॉल मिळाला. महिला बचतगटाने उत्पादित केलेली विविध उत्पादने या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत.

अकोला रेल्वेस्थानकाचे मुख्यखंड वाणिज्य निरीक्षक मोहम्मद यामीन अन्सारी, स्टेशन प्रबंधक ए. एस. नांदुरकर, रेल्वे पोलिस निरीक्षक युनूस खान, अर्चना गाडवे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, शैक्षणिक गुणवत्ता विकास कक्षाचे गजानन महल्ले, दीपिका देशमुख, सिंधू वानखडे, वैशाली देशमुख, पूनम पिसे उपस्थित होत्या. अरोरा म्हणाल्या, ‘‘प्रवाशांना प्रवासात सोईचा होईल, असा अल्पोपाहार व अन्य खाद्यपदार्थ उत्तम पॅकिंग करून द्यावेत. जिल्ह्याचे वैशिष्ट्य असणारी उत्पादनेही विक्रीसाठी ठेवावीत.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com