Mosambi Growers
Mosambi GrowersAgrowon

Organic Carbon : सेंद्रिय कर्बाच्या उपलब्धतेनुसार वाढेल उत्पादन ः डॉ. पाटील

मोसंबी फळ उत्पादक शेतकरी आपल्या बागेत जेवढे सेंद्रिय कर्ब वाढवेल तेवढ्याच प्रमाणात मोसंबी फळांचे उत्पादन वाढेल याकडे फळबागायतदारानी लक्ष द्यावे, असे आवाहन फळसंशोधक डॉ. मोहन पाटील यांनी लोहगाव (ता. पैठण) येथे केले.

लोहगाव, जि. औरंगाबाद : मोसंबी फळ उत्पादक शेतकरी (Mosambi Growers) आपल्या बागेत जेवढे सेंद्रिय कर्ब (Organic Carbon) वाढवेल तेवढ्याच प्रमाणात मोसंबी फळांचे उत्पादन वाढेल याकडे फळबागायतदारानी लक्ष द्यावे, असे आवाहन फळसंशोधक डॉ. मोहन पाटील यांनी लोहगाव (ता. पैठण) येथे केले.

माझा एक दिवस माझ्या बळीराजा साठी या उपक्रमात ते बोलत होते. गुरुवार (ता. १) रोजी शेतकरी मोहन डांगे, परमेश्वर डांगे यांच्या मोसंबी बागेत मोसंबी फळ उत्पादक शेतकऱ्यांना अंबिया बहार मोसंबी ताण खते, पाणी, नियोजन, व्यवस्थापन यावर राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प व विभागीय कृषी विस्तार केंद्रातर्फे माझा एक दिवस माझ्या बळीराजा साठी हा उपक्रम घेण्यात आला.

Mosambi Growers
Farmer Insurance : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी करा अर्ज

यावेळी डॉ.पाटील, यांनी बागेची वापसा,मशागत ताण,खोडाला लावण्यासाठी कमी खर्चात घरच्या घरी मोरचूद, चुना मिश्रणापासुन बोडोपेस्ट कसे तयार करावे, शेण खत, सेंद्रिय कर्ब, रासायनिक खते माञा, गधंक, बोडोमिश्रन, औषधी फवारणी, पाणी व्यवस्थापन, फळगळ थांबवण्यासाठी सेंद्रिय खताचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याचे, आवाहन केले.

Mosambi Growers
Agri Tourism : विषमुक्त शेतीतून कृषी पर्यटनाला आधार

तर राष्ट्रीय सहयोगी संचालक डॉ. एस. बी. पवार, वनस्पती शास्ञज्ञ डॉ. डि. जी. हिगोंले, किटकशास्ञज्ञ एन. आर. पंतगे, कृषी विस्तार अधिकारी डॉ. रामेश्वर ठोंबरे, यांनी बागेस चारही बाजूने हिरवे चा-याचे कुंपण, सुक्ष्म अन्नद्रव्ये, किटक नाशक फवारणी, खत माञा, पाणी नियोजन यावर मार्गदर्शन केले. त्यानंतर वनाकृवि संशोधित (गोदावरी ७११) तूर पीक पाहणी प्रात्याक्षिक झाले. यावेळी तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाट, मंडळ कृषी अधिकारी राधाकृष्ण कारले, कृषी सहायक माहोरे, गणेश इथापे, दिलीप जगताप उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com