

Weather Doppler Radars in Maharashtra : महाराष्ट्रात हवामानाचा अचूक अंदाज येण्यासाठी अनेक हवामान विभागाकडून अनेक उपाययोजना केल्या जातात. दरम्यान राज्यात नव्याने चार वेदर डॉप्लर रडार बसविण्याची प्रक्रिया चालू आहे. यातील मुंबई आणि नागपूर या ठिकाणी वेदर डॉप्लर बसवण्यात आले आहेत.
याचबरोबर अन्य प्रमुख ठिकाणीही हे बसवण्यासाठी योग्य त्या जागेचा शोध सुरू आहे. वेदर डॉप्लर पुण्यातही लवकरच असा रडार बसविण्यात येत असून, जागा शोधण्याचे काम सुरु असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी दिली.
दिवसेंदिवस नैसर्गिक आपत्तीमध्ये वाढ होत आहे. हवामान बदलामुळे मॉन्सूनची वाटचालही बदलल्याने अतिवृष्टीच्या घटना वारंवार होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात रडार बसवल्याने महाराष्ट्राला फायदा होणार असल्याचेही डॉ. होसाळीकर यांनी सांगितलं.
भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेत केंद्रीय पृथ्वीविज्ञान मंत्री किरण रिजीजू आणि डॉ. होसाळीकर यांची भेट झाली. या भेटीवेळी त्यांनी याबाबत महत्वपूर्ण माहिती दिली.
यावर होसाळीकर पुढे म्हणाले की, हवामानाच्या अंदाजाबरोबरच अतिवृष्टीच्या पूर्वसूचनेसाठी 'वेदर डॉप्लर रडार' महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. सध्या मुंबई आणि नागपूरमध्ये असे रडार बसविण्यात आले असून, लवकरच पुण्यातही ते बसविण्यात येतील, अशी माहिती डॉ. के. एस. होसाळीकर यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, हवामानाच्या अचूक अंदाजासाठी सध्या मुंबईमध्ये दोन आणि नागपूरमध्ये एक डॉप्लर रडार कार्यरत आहे. तसेच गोवा आणि तेलंगणातील रडारचाही महाराष्ट्राला फायदा होत आहे. राज्यात नव्याने चार वेदर डॉप्लर रडार बसविण्याची प्रक्रिया चालू असल्याची माहिती देण्यात आली.
काय आहे डॉप्लर रडार
पावसाची खात्रीशीर माहिती देणारी यंत्रणा म्हणजे वेदर डॉप्लर रडार होय. जगभरात वापरण्यात येणाऱ्या या यंत्रणेद्वारे (डॉप्लर रडार) विद्युत चुंबकीय लहरी ढगावर सोडल्या जातात. ढगांकडून परतणाऱ्या लहरी ढगाची 'एक्स रे' प्रमाणे इत्थंभूत माहिती आणतात.
डॉप्लर रडार ढग सरकत असतानाही अचूक माहिती देते. डॉप्लर रडारच्या साह्याने पावसाची, ढगफुटीची, गारपिटीची माहिती सहा ते चार तास आधी मिळू शकते. १०० किलोमीटरपर्यंतच्या परिघात पाऊस, गारपीट किंवा ढगफुटी कुठे कुठे होणार, हे किमान एक तास आधी खात्रीपूर्वक अचूक सांगता येते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.