Agricultural Mechanization Scheme : कृषी यांत्रिकीकरण योजनेत अडचणी

मनसेने वेधले लक्ष; ऑफलाइन अर्ज घेण्याबाबत निवेदन
 agricultural mechanization Scheme
agricultural mechanization SchemeAgrowon
Published on
Updated on

कुडाळ ः कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत (Agricultural Mechanization Scheme) ज्या शेतकऱ्यांनी पूर्वसंमतीद्वारे शेती अवजारे खरेदी केली आहेत व ज्यांना आता महाडीबीटी पोर्टलवरील (Maha dbt Portal) तांत्रिक बदलांमुळे कागदपत्र सादर करण्यास अडचणी येत आहेत, अशा शेतकऱ्यांचे आपल्या स्तरावरून ऑफलाईन पद्धतीद्वारे कागदपत्रे भरणा करून घ्यावेत. तसेच महाडीबीटी पोर्टल नियंत्रण कक्षास याबाबत अवगत करून तत्काळ लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी मनसेचे माजी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी तालुका कृषी अधिकारी कुडाळ यांचेकडे निवेदनाद्वारे केली.

 agricultural mechanization Scheme
Agriculture Mechanization : कृषी यांत्रिकीकरण ही काळाची गरज

महाडीबीटी वेबसाईटवरील तांत्रिक बदलांमुळे कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत मनसेने कृषी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यावेळी माजी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, ग्रामपंचायत सदस्य बाबल गावडे, माजी उपतालुकाध्यक्ष दीपक गावडे, सुंदर गावडे, वैभव धुरी, शेतकरी रामचंद्र घाडी, कृषी पर्यवेक्षक चव्हाण आदी उपस्थित होते. राज्यातील शेतकऱ्यांना कृषी विषयक साहित्य, अवजारे खरेदी करण्यासाठी शासनाकडून कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचे लाभ आणि सेवा वितरण करण्यासाठी शासनाकडून थेट लाभ हस्तांतरण प्रणाली (डीबीटी) कार्यपद्धती अंमलात आणली आहे;

 agricultural mechanization Scheme
Agriculture Mechanization : कृषी यांत्रिकीकरण योजनेत ११ कोटी अनुदानाचे वाटप

मात्र मागील महिनाभरापासून महाडीबीटी पोर्टलवरील तांत्रिक बिघाडांमुळे व सेवा बदलांमुळे शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण अवजारे खरेदी केल्यानंतर योजना अनुदान लाभ घेण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्या लाभार्थ्यांनी आधार क्रमांक लॉगिनवरून महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर केले होते, त्यांच्या अर्जांना लॉटरी सोडत कार्यपद्धतीद्वारे मंजुरी देखील मिळाली; मात्र आता प्रत्यक्षात कृषी अवजारे खरेदी केल्यानंतर संबंधित खरेदीचे कागदपत्र महाडीबीटी पोर्टलवर सादर करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक मानसिक व आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. महाडीबीटी पोर्टलवरून आता आधार बेस लॉगिन पद्धत बदल करून यूजर आयडी प्रणालीद्वारे प्रोफाईल निर्मिती करून अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती अमलात आणली गेली आहे. त्यामुळे यापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी आधार बेस पद्धतीद्वारे अर्ज सादर केले होते, त्यांना अवजारे खरेदी केल्याची कागदपत्रे सादर करण्यासाठी तांत्रिक अडचणीं येत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com