Fruit Market : गणेशोत्सवात फळांचे दर स्थिर

Fruit Market rate : गणेशोत्सवाला मंगळवारपासून (ता. १९) प्रारंभ होणार आहे. या उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर उत्साह दिसून येत असला तरी जीवनावश्यक वस्तूंबरोबर चैनीच्या वस्तूंचे भावही गगनाला भिडलेले आहेत.
Fruit
Fruit Agrowon

Ratbagiri News : गणेशोत्सवाला मंगळवारपासून (ता. १९) प्रारंभ होणार आहे. या उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर उत्साह दिसून येत असला तरी जीवनावश्यक वस्तूंबरोबर चैनीच्या वस्तूंचे भावही गगनाला भिडलेले आहेत. परंतु, बाप्पाच्या प्रसादासाठीच्या फळांचे दर गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी फारशी वाढ न होता स्थिर असल्यामुळे भाविकांना दिलासा आहे.

गेल्या काही वर्षांपासून सर्वच वस्तूंचे दर सातत्याने वाढत आहेत. गहू, तांदूळ, डाळींसह विविध भाज्या आदी जीवनावश्यक वस्तूंबरोबर चैनीच्या वस्तूंचीही दरवाढ सुरू आहे. दरम्यान, सर्वांच्या लाडक्या ‘बाप्पाचे’ आगमन मंगळवारी होत आहे.

Fruit
Citrus fruit Crop Management : सद्यःस्थितीतील लिंबूवर्गीय फळपिकांचे संरक्षण

बाप्पासाठी आरासासाठी वापरण्यात येणाऱ्या मखरांसह अन्य विविध प्रकारचे साहित्य बाजारपेठेत दाखल झाले आहे. या व्यतिरिक्त रोषणाईसाठी वापरण्यात येत असलेले विविध प्रकारचे रोषणाईचे आणि अन्य साहित्यही मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहे.

Fruit
Dragon Fruit Market : ड्रॅगन फ्रूटच्या दरात ६० रुपयांची वाढ

या साहित्याच्या दरात वाढ झाली आहे. मात्र श्रींच्या प्रसादासाठीच्या फळांचे दर सध्या स्थिर आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी फळांच्या दरात फारशी वाढ झालेली नसल्याची माहिती फळविक्रेते रामचंद्र गोंडाळ यांनी दिली.

दृष्टीक्षेपात फळांचे दर

फळाचे नाव दर (प्रति किलो)

सफरचंद १६०-१८० रू.

मोसंबी १२० रू.

केळी (डझन) ५०-६० रू.

नासपती २०० रू.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com