Rain Update
Rain UpdateAgrowon

Maharashtra Rain Update : राज्यात जोरदार पावसाची शक्यता

Rain Forecast : पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. गुरूवारी (ता. ७) सकाळपासूनच राज्याच्या विविध भागात पावसाला सुरूवात झाली.
Published on

Weather Update Pune : पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. गुरूवारी (ता. ७) सकाळपासूनच राज्याच्या विविध भागात पावसाला सुरूवात झाली.

आज (ता. ८) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाचा 'येलो अलर्ट' आहे. मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असून, उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र निवळल्यानंतर ओडिशा आणि छत्तीसगड परिसरावर समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. ही प्रणाली मध्य प्रदेशाकडे सरकण्याची शक्यता आहे.

Rain Update
Maharashtra Rain : राज्यभरात पावसाचा अंदाज; काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची हजेरी

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे आला असून, जैसलमेर, उदयपूर, इंदोर, बेतूल, गोंदिया, रायपूर, गोपालपूर ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. महाराष्ट्राच्या मध्य भागात पूर्व-पश्चिम वाऱ्यांचे जोडक्षेत्र तयार झाले आहे.

Rain Update
Monsoon Alert : आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने गुरूवारी (ता. ७) मॉन्सूनचा पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. सकाळपासून ढगाळ हवामान असून, उन्हाचा चटका कमी झाला आहे. आज (ता. ८) कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा आहे. मराठवाडा, आणि विदर्भातील काही जिल्ह्यता विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर.

विजांसह पावसाचा इशारा :

जालना, बीड, परभणी, बुलढाणा, वाशीम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com