Farmer Suicide : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ‘प्रेरणा’ प्रकल्प

शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून वर्ध्याची ओळख निर्माण झाली आहे. यावर उपाय म्हणून राज्य शासनाने प्रकल्प ‘प्रेरणा’ सुरू केला.
Farmer Suicide
Farmer Suicide Agrowon
Published on
Updated on

वर्धा ः शेतकरी आत्महत्याग्रस्त (Farmer Suicide Wardha) जिल्हा म्हणून वर्ध्याची ओळख निर्माण झाली आहे. यावर उपाय म्हणून राज्य शासनाने प्रकल्प ‘प्रेरणा’ (Prerna Project For Farmer Suicide) सुरू केला. जिल्ह्यात हा प्रकल्प प्रभावी ठरत असून आरोग्य विभागाच्या वतीने (Health Department) सध्या जिल्ह्यातील ५५ हजार शेतकऱ्यांवर समुपदेशन, औषधोपचार करण्यात येत आहे.

Farmer Suicide
Farmer Suicide : शेतकरी तरुणांच्या आत्महत्यांनी समाजमन सुन्न

जिल्ह्यात वर्ष २००१ ते २०२१ या कालावधीत तीन हजार १९५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. त्यात अंतिम अहवालात केवळ एक हजार १०१ शेतकरी मदतीस पात्र ठरले. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या लक्षात घेत वर्ष नोव्हेबर २०१५ मध्ये शासनाने प्रकल्प ‘प्रेरणा’ सुरू केला. त्यात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने मानसोपचार तज्ज्ञाचे पथक तयार करण्यात आले. शेतकऱ्यांच्या गृहभेटीतून त्यांच्या समस्या जाणून घेत आत्महत्येचे विचार मनात डोकावण्याच्या कारणांचा शोध घेण्यात आला.

यात वर्ष २०१५ ते २०२२ पर्यंत नैराश्यग्रस्त असलेले नऊ हजार ९४ शेतकरी आढळून आले. तर नैराश्यात व्यसनाधिनतेच्या आहारी गेलेले चार हजार ९९३ शेतकरी असल्याचे आढळून आले. मानसिक आजारानेग्रस्त व अन्य आजाराने पीडित ५४ हजार ६३४ शेतकऱ्यांवर समुपदेशन तसेच औषधोपचार करण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य विभाग तसेच सावंगी रुग्णालयाच्या माध्यमातून जिल्ह्यात हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. समुपदेशन प्रकल्पाला सुरुवात केल्यानंतर काही अंशी आत्महत्या कमी झाल्याचे आढळून आले.

समुपदेशन व औषधोपचारासाठी सात जणांची चमू आहेत. आठवड्याला तीन दिवस गृहभेटी देण्यात येते. यात एक दिवस समुपदेशन तसेच दोन दिवस औषधोपचार करण्यात येतो.
डॉ. सचिन तडस, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com