Natural Farming : 'नैसर्गिक शेतीला प्राधान्य द्या'

शेतीतल्या समस्या वरचेवर वाढत चालल्या आहेत. एकीकडे शेतीतला खर्च वाढतो आहे, पण त्याप्रमाणात नफा मिळत नाही.
Natural Farming
Natural FarmingAgrowon
Published on
Updated on

सोलापूर ः रासायनिक खताच्या (Chemical fertilizers) अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडला आहे, ही केवळ कोणा एका भागाची वा शेतकऱ्याची समस्या (Farmer Issue) नाही, तर ती संपूर्ण देशाची समस्या बनली आहे.

त्यामुळे काळाची पावले ओळखा, देश वाचवायचा असेल तर विषमुक्त, नैसर्गिक शेतीला प्राधान्य (Natural Farming) देणे आवश्यक आहे, असे मत आनंद (गुजरात) येथील नैसर्गिक शेती व सेंद्रिय शेती (Organic farming) विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सी. के. तिंबाडिया यांनी व्यक्त केले.

कृषी विज्ञान केंद्राच्या खेड येथील परिसरात दोनदिवसीय तंत्रज्ञान महोत्सव होत आहे. या कार्यक्रमाचे ऑनलाइन पद्धतीने डॉ. तिंबाडिया यांनी उद्‍घाटन केले. शबरी कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड अध्यक्षस्थानी होते.

या वेळी शबरी कृषी प्रतिष्ठानच्या संस्थापिका श्रीमती ऊर्मिलादेवी गायकवाड, विश्‍वस्त सौ. वैशाली गलांडे, आत्माचे संचालक डी. एल. तांभाळे, उपजिल्हा अधिकारी सोपान टोंपे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, भरडधान्य संशोधन संस्था सोलापूरचे प्रभारी अधिकारी डॉ. बसवराज रायगोंड, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे, उपविभागीय कृषी अधिकारी जयवंत कवडे, उद्योजक डॉ. महेश लोंढे उपस्थित होते.

डॉ. तींबाडिया म्हणाले, की शेतीतल्या समस्या वरचेवर वाढत चालल्या आहेत. एकीकडे शेतीतला खर्च वाढतो आहे, पण त्याप्रमाणात नफा मिळत नाही.

त्याशिवाय विषमुक्त अन्न मिळत नाही, ही एक वेगळीच समस्या बनली आहे. आता सरकारने त्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ तयार केल्याने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनाची सोय झाली आहे. शेतकऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी श्री. तांभाळे यांनी कृषी तंत्रज्ञान महोत्सवाची गरज का आहे, यावर मनोगत व्यक्त केले. शबरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. गायकवाड, श्री. टोंपे यांचीही भाषणे झाली.

प्रास्ताविकात डॅा. तांबडे यांनी कृषी तंत्रज्ञान महोत्सवाच्या आयोजनाचा हेतू सांगितला. सूत्रसंचालन विषय विशेषज्ञ अमोल शास्त्री यांनी केले, विषय विशेषज्ञ समाधान जवळगे यांनी आभार मानले.

Natural Farming
Organic Farming : सेंद्रिय शेती पद्धतीतील महत्त्वाची तत्त्वे

तज्ज्ञांची व्याख्याने, शिवारफेरी

यावेळी पुण्याचे भरडधान्य उद्योजक डॉ. महेश लोंढे यांनी ज्वारी, बाजरी, नाचणी व इतर भरडधान्याच्या प्रक्रियायुक्त पदार्थातून कसे अर्थार्जन केले जाऊ शकते, याबद्दल माहिती दिली.

सौ.वनिता तंबाखे यांनी उद्योजकतेमध्ये उतरायचे असल्यास कष्टाशिवाय पर्याय नाही. बाजारात चांगल्या पदार्थांना मागणी आहे, महिलांनी प्रक्रिया उद्योगात संधी आहे, असेही त्या म्हणाल्या.

डॉ. बसवराज रायगोंड यांनी भरडधान्यामध्ये पोष्टीकतत्व जास्त आहेत. प्रोटीन, लोह झिंकचे प्रमाण असल्याने माणसास पचायला अतिशय सुलभ असून, इतर आरोग्य विषयी समस्या कमी होतात. त्याचा आहारातील समावेश वाढवा, असे आवाहन केले.

या वेळी कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरातील विविध पिकांची शिवारफेरी काढण्यात आली. तसेच ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com