Kolhapur Bidri Sugar Factory Election : कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणुक पावसाच्या कारणामुळे स्थगित करण्यात आली असली तरी कोणत्याही क्षणी निवडणुका लागू शकतात. यामुळे विरोधकांनी आतापासूनच रान तापवण्याचे काम सुरू केले आहे. राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी माजी आमदार बिद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष के.पी.पाटील यांच्या विरोधात आवाज उठवायला सुरूवात केली आहे.
दरम्यान बिद्री कारखान्याच्या क्रमांक २ मधील शेतकरी सभासदांचा मेळावा राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा येथे झाला. यावेळी आमदार आबिटकर यांनी के. पी. पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.
ते म्हणाले की, के.पी. पाटील यांनी बिद्री कारखान्यात स्वतःचा आणि पैपाहुण्यांचा विकास साधत ऊस उत्पादकांना वाऱ्यावर सोडले. लेखापरीक्षणामध्ये संगनमताने ९६ कोटी ३६ लाखांचा तोटा दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक केली. त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली असल्याचे अबीटकर म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, लय भारी कारभाऱ्यांकडून जितका फायदा तितकाच तोटा दाखवला आहे, असा कारभार करणारा बिद्री हा जगातला पहिला कारखाना आहे. आकडेमोड करून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे, हे थांबवण्याची वेळ आली आहे, एफआरपीपेक्षा पाचशे रुपये शेतकऱ्यांना ज्यादा देण्याची भूमिका घेऊन बिद्रीचे रणांगण यशस्वी करण्याचा निर्धार आमदार प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला.
बिद्री शैक्षणिक संकुलाची दुरवस्था कुणामुळे ?
बिद्री शैक्षणिक संकुलाची दुरवस्था कुणामुळे ? सभासद शेतकऱ्यांच्या मुलांसाठी बिद्री येथे महाविद्यालय, शाळा आहे. या शाळेच्या दुरवस्थेकडे विद्यमान अध्यक्षांनी मुद्दाम दुर्लक्ष केले. मात्र, स्वतःच्या शाळेची भरभराट केली. के. पी. पाटील यांनी चेअरमन झाल्यानंतर आपली शिक्षण संस्था उभारली. मग कारखान्याच्या शिक्षण संस्थेला उतरती कळा कुणामुळे लागली? याचे उत्तर द्यावे, असा सवाल विजय बलुगडे यांनी केला.
ज्येष्ठ नेते मारुतीराव जाधव गुरुजी विजय बलुगडे, अशोकराव फराकटे, दत्तात्रय उगले यांनी मनोगते व्यक्त केली. अरुण जाधव, प्रा. अर्जुन आबिटकर, माजी संचालक नंदकिशोर सूर्यवंशी, के.जी. नांदेकर, अशोक फराकटे, वंदना जाधव उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.