Unseasonal Rain : नांदेड येथे अवकाळी पावसाची शक्यता

जिल्हा प्रशासनाने याबाबत नागरिकांना खबरदारीच्या उपाययोजना सुचविल्या आहेत. या काळात जिल्ह्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर प्रति किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
Unseasonal Rains
Unseasonal RainsAgrowon

Nanded News नांदेड : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार बुधवार (ता. १५) ते शुक्रवार (ता. १७) या कालावधीत नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे वाहण्याची, (Heavy Rain) तसेच विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची (Rain Forecast) शक्यता आहे.

खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.

जिल्हा प्रशासनाने याबाबत नागरिकांना खबरदारीच्या उपाययोजना सुचविल्या आहेत. या काळात जिल्ह्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर प्रति किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

Unseasonal Rains
Stormy Rain : देवळ्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीने दाणादाण

....अशा आहेत उपाययोजना

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळावे. मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल, तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.

Unseasonal Rains
IMD Rain Prediction: राज्यात तीन दिवस हलका ते मध्यम पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

आकाशात विजा चमकत असल्यास सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. घरातील विद्युत उपकरणे त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर राहा.

पाण्यात उभे असाल तर तत्काळ पाण्यातून बाहेर पडा. विजा चमकत असताना घरातील लँडलाइन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाइपलाइन यांना स्पर्श करू नका. कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. तंबूमध्ये, शेडमध्ये आसरा घेऊ नका, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com