PM Kisan Yojana : पीएम किसान लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, योजनेत केले नवीन बदल

PM Kisan Farmers : या महिन्याच्या कोणत्याही तारखेला किसान सन्मान योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
PM Kisan Yojana
PM Kisan Yojanaagrowon
Published on
Updated on

Pantpradhan Kisan Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे १३ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. दरम्यान शेतकऱ्यांना सध्या १४ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पहावी लागत आहे. या महिन्याच्या कोणत्याही तारखेला किसान सन्मान योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान पात्र शेतकऱ्यांची यादी तपासण्याचे काम कृषी विभागाकडून सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. म्हणून या योजनेचा निधी देण्यास विलंब होत असल्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला ६ हजार रुपये पाठवले जातात. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात दर ४ महिन्यांच्या अंतराने ३ हप्त्यांमध्ये वर्ग केली जाते. प्रत्येक हप्त्यात २ हजार रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी असणे बंधनकारक आहे.

तुम्ही अद्याप ई-केवायसी केले नसेल, तरीही तुम्हाला संधी आहे. पीएम किसान पोर्टलला भेट देऊन तुम्ही ई-केवायसी करू शकता. तुम्ही जवळच्या CSC केंद्राला भेट देऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.

दरम्यान महाराष्ट्र सरकारकडूनही राज्यातील लाखो शेतकऱ्यांना सन्मान निधी अंतर्गत ६ हजार देण्यात येणार आहेत. राज्य आणि केंद्र सरकार यांचे मिळून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तब्बल १२ हजार रुपये देण्यात येणार आहेत.

PM Kisan Yojana
Agriculture Department Action : शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या १४ विक्रेत्यांना दणका, सातारा कृषी विभागाकडून परवाने निलंबित

दरम्यान सरकारने पीएम किसान योजनेत काही बदल केले आहेत. लाभार्थी असल्याचे पाहण्यासाठीची पद्धतीत सरकारकडून बदल करण्यात आला आहे. पूर्वी शेतकरी मोबाईल क्रमांक किंवा आधार क्रमांकाच्या मदतीने त्याच्या हप्त्याची माहिती घेत होते.

आता पीएम किसान योजनेसाठी अर्ज करताना शेतकऱ्यांकडे नोंदणी क्रमांक असणे आवश्यक आहे. याशिवाय तुमचे कोणतेही अपडेट दिसणार नाही.

नोंदणी क्रमांक याप्रमाणे जाणून घ्या

तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक आठवत नसेल, तर पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर जाऊन. Know Your Registration Number वर क्लिक करावे लागेल. येथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर कॅप्चा कोड टाकावा लागेल. यानंतर, तुम्हाला स्क्रीनवर नोंदणी क्रमांक दिसेल.

पीएम किसान योजनेशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्येसाठी शेतकरी pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात. तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांक- १५५२६१ किंवा १८००११५५२६ या (टोल फ्री) किंवा ०११-२३३८१०९२ यावर संपर्क साधू शकता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com