Team Agrowon
विठ्ठलाच्या भेटीची ओढ असलेल्या लाखो वारकऱ्यांची आषाढी वारी पुढील महिन्यात सुरु होणार आहे.
देहू येथून १० जून २०२३ रोजी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान ठेवणार आहे
तर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 11 जून 2023 रोजी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवणार आहे.
आषाढीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी विशेष बस सेवा देण्याचा शिंदे-फडणवीस सरकारने निर्णय घेतला आहे
मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशी यात्रा पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. तसेच राज्यभरातून आलेल्या वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
पालखी मार्ग आणि पालखी तळावरील विविध सुविधांसाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. रस्ते दुरुस्ती, सपाटीकरण, अतिक्रमण काढणे, वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबतही आवश्यक कार्यवाही सुरू आहे
एसटी महामंडळाने पंढरपूर यात्रेसाठी केलेल्या नियोजनाचा आढावा बैठकीमध्ये वारीसाठी पाच हजार विशेष बस सोडणार असल्याचे सांगितले.
वाखरी येथील २७ जूनला होणाऱ्या माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी २०० अतिरिक्त बसही उपलब्ध केल्या जाणार आहेत.