River Pollution
River Pollution Agrowon

River Pollution : गोदाकाठावरील गावांमधील सांडपाणी अडविण्याचे नियोजन करा

गोदावरीचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी जिल्हा परिषदेने पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे.

नाशिक : गोदावरीचे वाढते प्रदूषण (River Pollution) रोखण्यासाठी जिल्हा परिषदेने (Zilla Parishad) पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी आज बैठक घेत गोदावरी वाहत असलेल्या त्र्यंबकेश्वर, नाशिक व निफाड तालुक्यातील नदीलगत असलेल्या गावांमध्ये सांडपाणी अडविण्याचे नियोजन केले आहे.

River Pollution
Farmer Death : शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर गावकऱ्यांचा संताप

त्यासाठी गोदेकाठी शोषखड्डे तयार केले जाणार असून घनकचरा अंतर्गत नियोजन केले जाणार आहे. या बाबत तिन्ही तालुका गटविकास अधिकारी यांना सूचना देण्यात आल्याची माहिती आशिमा मित्तल यांनी दिली.

गोदावरी नदीचे होणारे प्रदूषण रोखण्याकरिता नाशिक महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र, त्र्यंबकेश्वर, नाशिक अन निफाड तालुक्यातील गोदाकाठी असलेल्या गावांमधून नदीत सांडपाणी सोडले जात असल्याच्या तक्रारी आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सिद्धार्थ वनारसे यांनी सर्वसाधारण सभेत आवाज उठविला होता. तसेच तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांना पत्र दिले होते.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने बैठक घेत, उपाययोजना केल्या. मात्र, प्रत्यक्षात या उपाययोजना कागदावर राहिल्यात. आता पुन्हा मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी हा प्रश्नाला हात घातला आहे. सोमवारी (ता.२८) मित्तल यांनी बैठक घेत याबाबत चर्चा केली. बैठकीत त्र्यंबकेश्वर, नाशिक आणि निफाड या तीन तालुक्यात गोदावरी नदीकाठी येणारे गावे कोणती आणि किती आहे.? त्या गावांमधून जाणारे सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे का?

River Pollution
Agri Tourism : विषमुक्त शेतीतून कृषी पर्यटनाला आधार

याबाबत उपाययोजना काय होऊ शकतो.? शोषखड्डे केल्यास हे सांडपाणी नदीपात्रात मिसळणार नाही का? शोषखड्ड्यांबाबत मनरेगामधून कामे होऊ शकतील आदी विषयांवर तालुक्यांचे गटविकास अधिकारी आणि मित्तल यांच्यात चर्चा झाली. पुढच्या बैठकीत गटविकास अधिकाऱ्यांनी नियोजन करावे, अशी सूचना मित्तल यांनी यावेळी दिल्या.

गोदाकाठावरील गावांमधील सांडपाणी नदीत सोडले जात असल्याने पाणी दूषित होते. यावर उपाययोजना करण्यासाठी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या. मात्र, उपाययोजना झालेल्या नाहीत. या दूषित पाण्याचा फटका गोदाकाठावरीलच अनेक गावांना बसतो. प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. - सिद्धार्थ वनारसे, माजी सदस्य, जिल्हा परिषद

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com