Team Agrowon
पणदूर (जि. सिंधुदुर्ग) येथील ‘ॲग्रीकार्ट फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने मुख्य भात व अन्य पीकवाणांचा मिळून सुमारे ७१ देशी व दुर्मीळ बियाण्यांचा संग्रह बीज बँकेच्या रूपाने केला आहे.
बियाणे संकलन, संवर्धन, बीजोत्पादनासह बियाणे विक्री व तांदळाची विक्रीही कंपनीने सुरू केली आहे. त्यातून कंपनीच्या सदस्यांचे अर्थकारण उंचावण्यासही मदत होत आहे.
शेतकरी कंपनीच्या सभासदांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन विविध गावांतील शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेणे, त्यांच्याकडून बियाण्यांचे संकलन करणे अशा प्रकारची मोहीमच सुरू केली. ३० हून अधिक भातबियाण्यांचे संकलन करून कंपनीला दिले. काही कडधान्ये दिली.
लाल तांदळाचे सुमारे ३० प्रकार. उदा. वालय, बेळा, सोरटी, लाल पाटणी, खोचरी, सोनफळ, दोडत, विक्रम, तुर्या, खारा मुणगा, बारीक पाटणी, फोंडा, महाडी, सरवट, घाटी पंकज, मोगरा, डामगा, शिर्डी, काळा वरंगळ, कागो, सणाणा, हडसू, जाड मुणगा, छोटा बेळा, सफेद बेळा,
लावेसाळ, लाल कुडा, खामडी, खारल
अन्य भातवाण- पांढरा वालय, यलकर, पाठेरे भात, यलकट पाटणी, सफेद घाटी पंकज, गुंजवळा
कोथिंबिरी, राजवेल, नवाण हे सफेद. भाताच्या सुमारे ४५, तर अन्य पिकांच्या २६ वाणांचे संकलन. सुंगधी भातावर प्रयोग सुरू.
संकलित बियाण्यांची लागवड, चिकित्सा, त्यातून शुद्ध बीज निवडणे, ते गरजू किंवा इच्छुक शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यास कंपनीने सुरुवात केली. तीन- चार गावांत ३६ एकरांवर काही प्रयोग घेण्यात आले.
आरोग्यदायी म्हणून महत्त्व असलेल्या वाणांची विक्री करण्याचे कंपनीने ठरविले. वालय या लाल तांदळाची पेज तापासाठी उपयुक्त ठरते हे समजल्यानंतर त्यास मागणी वाढली. कंपनीने अनेक शेतकऱ्यांकडून हा तांदूळ खरेदी करून त्याची विक्री केली.