Crop Insurance : खरीप पीकविमा योजनेत २ लाख शेतकऱ्यांचा सहभाग वाढला

Kharif Crop Insurance : यंदाच्या (२०२३) खरीप हंगामात पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत परभणी व हिंगोली जिल्ह्यांत मंगळवार (ता. ४) अखेर एकूण १२ लाख ७३ हजार ८१९ शेतकऱ्यांनी पीकविमा अर्ज भरले आहेत.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

Parbhani News : यंदाच्या (२०२३) खरीप हंगामात पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत परभणी व हिंगोली जिल्ह्यांत मंगळवार (ता. ४) अखेर एकूण १२ लाख ७३ हजार ८१९ शेतकऱ्यांनी पीकविमा अर्ज भरले आहेत. या दोन जिल्ह्यांत गतवर्षीच्या तुलनेत यंदा पीकविमा योजनेत २ लाख १३ हजार ५०५ एवढे जास्त शेतकरी सहभागी झाले आहेत.

त्यात परभणी ८९ हजार ८२८, तर हिंगोली जिल्ह्यात १ लाख २३ हजार ६७७ एवढे जास्त अर्ज आले आहे. यंदा या दोन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी एकूण ८ लाख २६ हजार ९०७ हेक्टरवरील पिकांसाठी विमा संरक्षक कवच घेतले आहे.

परभणी जिल्ह्यात मंगळवार (ता. ४) पर्यंत कर्जदार ४ हजार ३७४ व बिगर कर्जदार ७ लाख ५७ हजार ३५१ शेतकरी मिळून एकूण ७ लाख ६१ हजार ७२५ शेतकऱ्यांनी पीकविमा अर्ज दाखल केले आहेत. या शेतकऱ्यांनी ५ लाख १ हजार ७ हेक्टरवरील पिकांसाठी २ हजार ६१६ कोटी १७ लाख रुपये एवढ्या विमा रकमेचे संरक्षण घेतले आहे. शेतकऱ्यांनी प्रतिअर्ज १ रुपयानुसार ७ लाख ६१ हजार ७०२ रुपये विमा हप्ता भरला आहे.

Crop Insurance
Crop Insurance : पीकविमा भरणाऱ्यांना ७२ तासांची अट रद्द करा

राज्य शासनाच्या हिश्शाचा ४०३ कोटी २५ लाख रुपये व केंद्र शासनाच्या हिश्शाचा ३३७ कोटी ९१ लाख रुपये मिळून एकूण ७४१ कोटी २४ लाख रुपये विमा हप्ता आहे. गतवर्षी (२०२२) पीकविमा योजनेत जिल्ह्यातील ६ लाख ७१ हजार ८९७ शेतकरी सहभागी होते. त्यातुलनेत यंदा शेतकऱ्यांचा सहभाग ११३.३७ टक्के आहे. यंदा संपूर्ण राज्यात पीकविमा योजनेतील एकूण सहभागी शेतकरी अर्जामध्ये परभणी जिल्ह्याचा वाटा ४.४९ टक्के आहे.

Crop Insurance
Crop Insurance : पीकविमा योजनेला ‘रेकॉर्डब्रेक’ प्रतिसाद

हिंगोली जिल्ह्यात मंगळवारी (ता. ४) अखेर कर्जदार ६ हजार ५२८ शेतकरी व बिगर कर्जदार ५ लाख ५ हजार ५६६ मिळून एकूण ५ लाख १२ हजार ९४ शेतकऱ्यांनी पीकविम्याचे अर्ज दाखल केले आहेत. या शेतकऱ्यांनी ३ लाख २५ हजार ९०० हेक्टरवरील पिकांसाठी १ हजार ७२१ कोटी २३ लाख रुपये एवढ्या विमा रकमेचे संरक्षण घेतले आहे. शेतकऱ्यांनी प्रतिअर्ज १ रुपयानुसार ५ लाख १२ हजार ८९ रुपये विमा हप्ता भरला आहे.

राज्य शासनाच्या हिश्शाचा १७१ कोटी ३८ लाख रुपये व केंद्र शासनाच्या हिश्शाचा १३२ कोटी ४० लाख रुपये मिळून एकूण ३०३ कोटी ८२ लाख रुपये विमाहप्ता आहे. गतवर्षी (२०२२) पीकविमा योजनेत एकूण ३ लाख ८८ हजार ४५७ शेतकरी सहभागी होते. त्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांचा सहभाग १३१.८४ टक्के आहे. यंदा संपूर्ण राज्यात पीकविमा योजनेतील एकूण सहभागी अर्जामध्ये हिंगोली जिल्ह्याचा वाटा ३.०२ टक्के आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com