Painganga River : वाण, मोर्णा, विद्रूपा, मन, तोरणा, पैनगंगाचे होणार खोलीकरण

Department Of Water Resources : राज्यात आगामी काळात २८ जिल्ह्यांत सुमारे १४२ नद्यांच्या पात्राचे १ हजार ६४८ किलोमीटर लांबीचे खोलीकरण केले जाणार आहे.
Painganga River
Painganga RiverAgrowon
Published on
Updated on

Akola News : राज्यात आगामी काळात २८ जिल्ह्यांत सुमारे १४२ नद्यांच्या पात्राचे १ हजार ६४८ किलोमीटर लांबीचे खोलीकरण केले जाणार आहे. याबाबत जलसंपदा विभागाने निर्णय घेतला असून, अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत काम करेल.

पश्‍चिम विदर्भात अकोल्यात वाण, मोर्णा, विद्रूपा, तर बुलडाणा जिल्ह्यातील मन, पैनगंगा व तोरणा या तीन नद्यांचा समावेश करण्यात आला आहे. अकोल्यात ६५, तर बुलडाणा जिल्ह्यात ५० किलोमीटर खोलीकरणाचे काम केले जाईल.

नदी, नाल्यांना येणाऱ्या पुरामुळे दरवर्षी मोठे नुकसान होत असते. वर्षानुवर्षे नद्यांचे पात्र उथळ झाले. त्यातून पाणी वाहून जाण्याची क्षमता कमी झाल्याने पुराच्या काळात हे पाणी थेट नागरी वस्त्या, शेतशिवारात शिरते. त्यामुळे जीवितहानी, वित्तहानी होत असते. हे टाळण्यासाठी पूर प्रतिबंधक नद्यांच्या वहन मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी ही योजना राबवली जाणार आहे.

अकोला जिल्ह्यातील वाण नदीचे एकूण ४५ किलोमीटर खोलीकरण केले जाईल. मोर्णा १२ किलोमीटर व विद्रूपा नदीचे ८ किलोमीटर अंतरात खोलीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. बुलडाणा जिल्ह्यात मन नदीचे २० किलोमीटर, तोरणा १०, तर पैनगंगा नदीचे २० किलोमीटर असे सर्व मिळून ५० किलोमीटर भागाचे खोलीकरण यातून केले जाईल.

Painganga River
Krishna River Water Level : कोयना, राधानगरी, अलमट्टीतून विसर्ग कायम

मागील अनेक वर्षांपासून नद्या वाहत असताना त्यामध्ये दगड, माती, झुडपे व झाडे वाढली. यामुळे नदीची वहनक्षमता कमी झाली. गेल्या काही वर्षांमध्ये कमी वेळेत जास्त प्रमाणात म्हणजेच ढगफुटी सदृश पाऊस पडण्याचे प्रमाण वाढले. यामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होत आहे.

Painganga River
River Revival : असे झाले होळणा नदीचे पुनरुज्जीवन

अनेक वर्षे असाच प्रकार होत असल्यामुळे नदीतच छोटीमोठी बेटे तयार होत असल्याचे चित्र आहे. याचा परिणाम म्हणजे कमी वेळेत थोडा जरी जास्त पाऊस झाला तरी नदीपात्र उथळ बनल्यामुळे पाणी लगेच शेजारच्या परिसरात पसरायला सुरुवात होते. त्यासाठी नद्यांचे खोलीकरण क्रमप्राप्त होते. त्यानुसार राज्यातील या १४२ नद्यांचे ठरावीक अंतरातून खोलीकरण केले जाणार आहे.

बुलडाणा जिल्ह्यात घाटावरील नद्यांचे खोलीकरण केले जाईल. घाटाखालील संग्रामपूर, जळगाव जामोद, मलकापूर व शेगाव तालुक्यांत पुरांच्या घटना ताज्या आहेत. नांदुरा महामार्गापासून पूर्णा नदीपर्यंतचा परिसर अतिवृष्टीमुळे कसा प्रभावित झाला हे दिसून आले. त्‍यामुळे घाटाखालील नद्यांचा या प्रकल्पात समावेश होणे गरजेचे होते.
- रामकृष्ण कुटे पाटील, जलतज्ज्ञ, नांदुरा, जि. बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com