APMC Election : अखेर महाविकास आघाडीचा पॅनेल ठरला

छत्रपती संभाजीनगर येथे शुक्रवारी (ता. २१) झालेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्यावतीने पॅनेलची व उमेदवाराची घोषणा करण्यात आली.
apmc election
apmc electionAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhaji Nagar News येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या एकत्रित महाविकास आघाडीने शेतकरी महाविकास आघाडी विकास पॅनल मैदानात उतरवली आहे.

या पॅनेलमध्ये काँग्रेसचे पारडे जड दिसत असून त्यांच्या वाटेवर ९, तर राष्ट्रवादी व सेनेच्या वाटेवर प्रत्येकी तीन उमेदवार आले आहेत.

छत्रपती संभाजीनगर येथे शुक्रवारी (ता. २१) झालेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्यावतीने पॅनेलची व उमेदवाराची घोषणा करण्यात आली. या पत्रकार परिषदेला माजी आमदार कल्याण काळे, माजी आमदार कैलास पाटील, विलास औताडे, सेना उपजिल्हाप्रमुख अशोक शिंदे, आनंदराव भालेकर, शंकरराव ठोंबरे, संतोष शेजूळ आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

apmc election
Nagar Market Committee Election : नगर बाजार समिती निवडणुकीत अनेक ठिकाणी दुरंगी-तिरंगी लढती

यावेळी माजी आमदार श्री काळे म्हणाले, की चर्चा करून महाविकास आघाडीने उमेदवारांची निश्‍चिती केली आहे. फुलंब्री बाजार समिती निवडणुकीतही महाविकास आघाडी एकत्र आहे. जिथे ज्या पक्षाची ताकद जास्त त्या पक्षाला अधिकची उमेदवारी असे धोरण ठरले आहे. मागच्या वेळी आता एकत्र असलेले आम्ही वेगवेगळे निवडणुका लढलो होतो.

शिवाय आमचीच माणसे तोडून बाजार समितीत आपली सत्ता आणण्याचे प्रयत्न केले गेले. त्यानंतर बाजार समितीत झालेला अनागोंदी कारभार सर्वांना ज्ञात आहे. बाजार समितीची अनेक प्रकरणे न्यायालयात आहेत.

येत्या २८ तारखेला मतदान होईल. त्यात महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार शंभर टक्के निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या शेतकरी महाविकास आघाडी विकास पॅनेलमधील उमेदवारांची घोषणा करण्यात आली.

त्यानुसार सहकारी संस्था मतदार संघातून संजय तुकाराम औताडे, जगन्नाथ वैजिनाथराव काळे, अतुल रमेश गावंडे, नाना अण्णा पळसकर, भगवान सर्जेराव मते, भगवान भाऊसाहेब मुळे, मुकुंद तुकाराम शिंदे,

apmc election
Nanded Market Committee Election : नांदेड बाजार समिती निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फार्म्यूला ठरला

सहकारी संस्था महिला राखीव मतदार संघातून सविता नारायण अंभोरे व नंदाबाई त्रिंबक पठाडे, सहकारी संस्था इतर मागासवर्गीयमधून सावता विठ्ठल गाडेकर, सहकारी संस्था विमुक्त जाती भटक्या जमाती मतदार संघातून विठ्ठल नामदेव कोरडे,

ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघातून कैलास ज्ञानदेव उकर्डे, अनुराग अप्पासाहेब शिंदे, ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मतदार संघातून अब्दुल रहीम अब्दुल सलाम पठाण, ग्रामपंचायत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मतदार संघातून महेंद्र जनार्दन खोतकर हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com