Pandharpur : बंधुत्वाचा संदेशाने पंढरपूर-घुमान नाते पुन्हा तयार होणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ः पंढरपूर ते घुमान सायकलवारीचा प्रारंभ
Pandharpur
PandharpurAgrowon

पंढरपूर, जि. सोलापूर : संत नामदेव महाराजांनी चालत जाऊन भारतभर भागवत धर्माचा प्रसार केला. विश्‍व, बंधुत्वाचा संदेश दिला. या संदेशाला सायकल व रथ यात्रेतून उजाळा मिळणार आहे. त्यांचा बंधुत्वाचा संदेश आणि भागवत धर्माचा विचार या यात्रेतून घुमानपर्यंत पोहोचणार आहे. यानिमित्ताने पंढरपूर-घुमान (Pandharpur - Ghuman) यांचे पुन्हा एकदा नाते तयार होणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी येथे केले.

शासकीय विश्रामगृह येथे भागवत धर्मप्रसारक समिती, पालखी सोहळा पत्रकार संघ, नामदेव समाजोन्नती परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंढरपूर ते घुमान सायकल व रथ यात्रेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आला. या वेळी ते माध्यमांशी बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, आचार्य तुषार भोसले, संत नामदेव महाराज यांचे वंशज ज्ञानेश्‍वर महाराज नामदास, शिंपी समाज अध्यक्ष गणेश उंडाळे, उपाध्यक्ष संजय जवंजाळ, राजेश धोकटे, सुनील गुरव, गणेश जामदार, सूर्यकांत भिसे आदि उपस्थित होते.

Pandharpur
मेळघाटातील २४ गावे उजळणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

श्री. फडणवीस म्हणाले, की वारकरी संप्रदायामध्ये संत नामदेव महाराजांना मोठा मान आहे. महाराजांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात फिरून भागवत धर्म, समता, बंधुता याची शिकवण दिली होती. यामुळेच शिखांच्या धर्मग्रंथामध्ये देखील महाराजांचे अभंग आहेत. नामदेवरायांनी महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, हरियाना व पंजाबमध्ये पायी धर्मप्रचार केला. त्याच रस्त्यावरून सदर सायकल दिंडी जाणार आहे, ही आनंदाची बाब आहे.

Pandharpur
पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या २२ प्रतिज्ञांच्या उजळणीची गरज

२८ नोव्हेंबरला समारोप

पंढरपुरातून निघालेली ही सायकल व रथयात्रा संत नामदेवांच्या ७५२ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या भागवत धर्माच्या केलेल्या कार्याचा उजाळा म्हणून आयोजित केली असून, चार नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत घुमानपर्यंत चालणार आहे. रथयात्रेमध्ये दोन रथ, ११० सायकलींसह ५० वर्षांच्या पुढील १५ महिला, ९५ पुरुष सामील झाले असून, ते रोज शंभर किमीचा प्रवास करणार आहेत. २८ नोव्हेंबरला पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते चंडीगड येथील राजभवनामध्ये रथयात्रेचा समारोप होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com